विकेन्ड तुळशीबागेत जाऊया ना मग? नको खूप गर्दी असते वीकेंडला… त्यापेक्षा हाँगकाँग लेन जाऊ… मी काय म्हणते. … “सुजाता” मस्तानी हं पुढच्या रविवारी नको “वैशाली”ची साऊथ इंडियन काॅफी घेऊ.. ऐक ना माझं..“बाल गंधर्व”ला नाटक पाहू.. अगं..”अलका” ला Ghost लागलाय वीकेंडला तो पाहू… दावणगिरी डोसा मात्र ठरलं हा सिनेमानंतर… ऐक ना कॅम्पातील कयानी बेकरीत जाऊ… या वीकेंडला सायकलींग …पर्वती… खाली उतरल्यावर अमृततुल्य चहा… नाही हं धन्वंतरी ऊसाचा रस घेऊ … नेक्स्ट संडे वाॅटर पार्क ला जाऊ काहीही काय …नाही हं …पानशेतला जाऊ … : : : काहीतरी खुपतंय…बरंच काही चुकतंय… बरंच काही विसरतंय…नाही सारंच विस्कटलंय तारा जुळेनात.....सूर हरवू लागलेत.... आता…उशीर व्हायच्या आत भेटूया ना प्लीज … फक्त दोघं एकमेकाला… वाचूया ना पुन्हा…तू मला अन् मी तुला… तू आणि मी…. जाऊया ना ....डेटवर शोधूया ना मी तुला नि तू मला … पापण्यांच्या आड….खोल… दोन श्वासातील अंतरात….मंद स्मितात… आठवूया ना चुकून झालेला… पहिला वहिला… एकमेकांना स्पर्श…. बोलवूया ना पुन्हा….. चंद्र, तारका,ग...
Posts
Showing posts from February, 2024
- Get link
- X
- Other Apps
मला भावलेल्या स्त्री व्यक्तिरेखा लता मंगेशकर काही महिन्यांपासून मी जेव्हा “मला भावलेल्या इतिहासातील स्त्री व्यक्तिरेखा” ह्या शीर्षकाखाली लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा लता मंगेशकर ह्या व्यक्ती विषयी लिहायचे हे अनेकदा मनात येऊन गेले. पण केवळ ह्यासाठी लिहिले नाही की इतिहासातील कुठे आहेत दीदी? त्या तर आपल्याबरोबर आहेत. छान गातायेत. आणि दुसरे कारण त्यांच्याविषयी लेख न लिहिण्याचा हे की त्या सामान्य स्त्री नाहीयेत तर त्या स्त्री रूपातील साक्षात सरस्वतीची अवतार आहे. दैवत आहेत. संगीत प्रेमी, तरुण, वृद्ध, बाळ गोपाळ यांची देव्हाऱ्यात वीणा घेऊन बसलेली गानसरस्वती. आणि अशा दैवताबद्दल माझ्यासारखी लहान, अतिसामान्य व्यक्ती काय लिहिणार? माझी वाणी मूक होते, अचंबित होते लताताई तुझे गाणे ऐकून! तरी आज मी तुझ्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केलाय..... आज सकाळी जी बातमी पाहिली की आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लतादीदी काळाच्या पडद्याआड…. आणि अचानक घड्याळ थांबल्यासारख झालं, तिथेच थिजल्यासारखं झालं… हे कसं शक्य आहे? देव्हाऱ्यासमोर जाऊन पाहिलं, सगळे देव आहेत की, सरस्वती ही आहे तिथे...
- Get link
- X
- Other Apps
मला भावलेल्या इतिहासातील स्त्री व्यक्तिरेखा शकुंतला मागील लेखात मी वरील शीर्षकाखाली लिहिलेली पहिली स्त्री व्यक्तिरेखा होती ती म्हणजे “उर्मिला”. आज आपण दुसऱ्या क्रमांकावरील व्यक्तिरेखा बघू “शकुंतला”. शंकुतला म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर येतं ते महाकवी कालिदासांचं अजरामर काव्याचं नाट्य रूपांतर “अभिज्ञान शाकुन्तलम”. हे एक संस्कृत मधील मधुर असं काव्य म्हंटलं जातं. कालिदासांनी अधिक बारकावे दाखवण्याकरिता ह्या काव्याला खूप भावनाप्रधान करण्याचा प्रयत्न केलाय. खूप प्रणय आणि तळमळ दाखवली गेली आहे. पण दुष्यन्त राजाच्या प्रेमिके पलीकडेही तिचं व्यक्तिमत्व होतं हे व्यासांच्या महाभारतात लक्षात येतं . कसं ते बघू या. शकुंतलेच्या जन्माचे रहस्य देवांचा देव इंद्र ह्याला जेव्हा विश्वामित्र ऋषी घोर तपश्चर्या करून आपल्या पेक्षा श्रेष्ठ होतील की काय अशी भीती वाटू लागते तेव्हा ते अप्सरा मेनका हिला त्यांची तपश्चर्या भंग करण्या करता पाठवतात . आणि मेनका आपल्या कार्यात सफल होते. ते दोघं बरेच...
- Get link
- X
- Other Apps
मला भावलेल्या इतिहासातील स्त्री व्यक्तिरेखा उर्मिला आजपासून मी आपल्याला मला भावलेल्या अनेक स्त्री व्यक्तिरेखांपैकी काही व्यक्तिरेखा बद्दल लिहिणार आहे. ह्याची सुरुवात मी रामायणातील मला, सीते इतकेच महान वाटणारे, पण दुर्लक्षित ठेवली गेलेले व्यक्तिमत्व, “उर्मिला” हिच्या पासून करते आहे. उर्मिलेची,सर्वश्रुत असलेली ओळख, म्हणजे लक्ष्मणाची पत्नी आणि सीतेची बहीण. पण माझ्या करता, उर्मिला एक आदर्श बहीण होती, आदर्श पत्नी होती,आदर्श सून पण होती! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आदर्श ऍडमिनिस्ट्रेटर होती. चला तर मग जाणून घेऊ तिच्या विविध छटा! आदर्श बहीण- उर्मिला जनक राजाची मुलगी आणि सीतेची बहीण होती. उर्मिला सीते पेक्षा एक वर्षाने लहान होती. जनक राजास यज्ञासाठी जमीन नांगरताना सापडलेली भूमिपुत्री सीता. “जनक” राजाची मुलगी म्हणजे “जानकी” खरं तर उर्मिला, पण जानकी म्हणून गौरवले गेले सीतेला ; जी जनक राजाची दत्तक कन्या होती. पण उर्मिलेनी ही गोष्ट सीतेला कधीही तिने जाणवू दिली नाही. उर्मिलेचा मनाचा मोठेपणा इतका की तिने कधीही मनात हेवा दावा न बाळगता, सीतेवर जीवापाड प्र...