ध्यास
ध्यास बाबांची गोष्ट “पुणे विद्यार्थी गृहा”चा १२मे ला ११७ वा वर्धापनदिन होता. त्यानिमित्त काल सोहळा आयोजित करण्यात आला होता.मला बाबांबरोबर तो सोहळा अनुभवता आला. पुणे अनाथ विद्यार्थी गृह इथे माझे बाबा वयाच्या पंधराव्या वर्षीपासून राहिले.बाबांचे वडील ते पाच वर्षाचे असताना गेले.सोलापूर जिल्ह्य़ातील माळीनगर इथे दहावीपर्यंत शिकून शिक्षणाच्या ओढीपायी बाबा पुण्यात आले.हाती पैसा नाही.घर नाही.अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवून शिक्षण कसे घ्यावे याचा ध्यास बाळगत बाबा सदाशिव पेठेतील पुणे अनाथ विद्यार्थी गृहात राहू लागले. आश्रमात सांगतील ती कामं करावी लागत. जसं झाडलोट,दूध वाटणे,रूग्ण मित्र बनून आजारी विद्यार्थ्यांची सेवा करणे रात्री पहारा देणे इत्यादी.रोज पहाटे उठून गार पाण्याने आंघोळ, कामं व नंतर राम मंदिरात प्रार्थना असे. ज्यामुळे मनोबल वाढे .लाल मातीत असलेली तालीम जिथे बाबा व इतर तरूण मुले कुस्ती लढत. नंतर संस्थेच्याच आवारात खोल विहीरीत पोहणे.यामुळे शरीर तंदुरुस्त राही. हायस्कूल मधील म...