Posts

Showing posts from December, 2024
Image
                    कोवळं ऊन आजी रोज दुपारी कलत्या ऊन्हाची झालर अंगावर घ्यायची.जणूकाही किरणांची दुलई पांघरायची.खिडकीतून छान कोवळं ऊन आत यायचं.थंडीत पारा खाली गेला की दुपारचं ऊनही कोवळं वाटायचं. आजी फणीने केस विंचरत , छानसा अंबाडा घालत ऊन्हात बसायची. तिचे निळसर झालेले डोळे ऊन्हात प्रिझमसारखे चमकायचे. निळ्या लोलकांतून सूर्यकिरणं परावर्तित होऊन निरागस हास्य तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर दिसायचं.आणि काय तेजःपुंज दिसतेय असं आजोबा तिला थट्टेने म्हणायचे. सुवर्णरश्मींची पैठणी नेसायला भाग्य लागतं . "काहीतरीच" म्हणत आजी लाजायची.  आजोबा सकाळी आंघोळ करून सूर्याला अर्ध्य देताना ,नमस्कार करताना  अभिमानाने आजी त्यांना सूर्यपुत्र असं संबोधायची. मग आजोबा समोरच्या अंगणात आरामखुर्चीत रेलून ऊन अंगावर घेत वर्तमानपत्र वाचत बसायचे.पेपर वाचताना अर्धा तासाची डुलकी आजोबांची हमखास असायची.आपण झोपलो होतो छान हे त्यांना कधीच मान्य करायचं नसे. आजी आजोबांच्या ह्या कोवळ्या ऊन्हाला नजर लागली अचानक. मागच्या वर्षीपासून शेजारी उंच टाॅवर, फ्लॅट बांधकामं सुरू झाल...
Image
                        गोधडी    माईआजी नेहमीच नातवांना फुलासारखं जपायची.रोज रात्री गोधडी हळूच पांघरायची.  माईआजीची गोधडी जणू आपल्या कुशीत घेवून निजवायची. दुपार झाली की मानेतून पाठीतून वाकलेली आजी उन्हं अंगावर घेत आवडीचं काम करत बसायची. आधीच बारीक डोळे आजी अजून बारीक करायची.आणि सुई दोरा घेऊन गोधडी शिवत बसायची. दुधावरच्या सायीसारखी..मऊ  मऊ कापसासारखी..नऊवारी लुगडी घेऊन घडीवर घडी घालायची… सुखदुःखं, कडूगोड आठवणी ठिगळं लावून जोडायची.. जोडत असताना कितीदा सुई टोचायची अन् रक्ताचा थेंब हळूचकन आजी टिपायची पण टीप उसवू नाही द्यायची. आपल्या प्रेमळ हातांनी तशीच धावदोरा घालायची. गोधडी रेडी झाली की दिमाखात दाखवायची. नातवांना गोधडीत घेऊन बागुलबुवापासून लपवायची.थंडीला तर दूर दूर पळवायची. आताशा आजीचं वयही झालं होतं…थकली होती..  नातवांनी वाड्यात खूप शोधलं एकदिवशी.. पण आजी आता कधीच दिसणार नव्हती ..पोरांच्या आसवांनी ओलिचिंब झाली होती गोधडी. आजीच्या जाण्याने गोधडीपण हळवी झाली होती. आजीसारखीच सुरकुतली होती ती पण जराशी. जरा ...

आंबटगोड

Image
                   आंबटगोड आई काहीतरी गोड कर ना अगं.. जरा अगोड  सूनबाईऽऽऽ विदाऊट शुगर अख्खं आयुष्य आई बिचारी गोड ..अगोड करत होती  साधं वरण तर कधी फोडणीचं..  हवं नको बघत होती.   आमसूल की चिंच? ही तारेवरची कसरत रोज उठून करत होती… आई बिचारी प्रत्येकाला रोज आवड विचारत होती..दही घालून, बिना दह्याची कोशिंबीर वाढत होती.. आवडी सार्‍यांच्या प्रेमाने ती हमखास जपत होती.मात्र …एक दिवशी आई सारं काही विसरली.. आंबट गोड करता करता आपलीच चव विसरली.. कुणी नाही विचारलं तरी …. मला काहीही आवडतं.स्वतःशीच म्हणाली. स्वतःसाठीही जगायचं असतं हे पण विसरली… आवडता रंग,आवडीचा पदार्थ, आवडता सिनेमा, आवडतं गाणं…सारं सारं विसरली.मी विचारलं “आई, तुला काय आवडतं?” तर आश्चर्याने माहीत नाही म्हणाली..विचारच केला नाही गं म्हणाली… तेवढा वेळही नाही म्हणाली. कुणी कधी मला तसं विचारलं नाही म्हणाली… मला सगळंच आवडतं असं सहजतेने म्हणाली..   मी तिला विचारलं म्हणून मलाच थॅंक्स म्हणाली…कसनुशी हसली अन् पदराने डोळे पुसताना.. कचरा गेलाय म्हणाली..आंबटगोड ...
Image
                      गोधडी    माहीत नाही हे सारं.. आजीकेव्हा करायची.. नातवांना आपल्या फुलासारखं जपायची.रोज रात्री मऊ पांघरूण हळूच घालायची. आधीच बारीक डोळे ती अजून बारीक करायची.सुई दोरा घेऊन गोधडी शिवत बसायची.दुधावरच्या सायीसारखी..मऊ मऊ कापसासारखी..माईआजी आमची गोधडी करत बसायची. सुखदुःखाची ठिगळं हसत हसत जोडायची..तिच्या नऊवारी लुगड्यांची घडीवर घडी घालायची…मायेच्या धाग्यांनी त्यांना टाके अलगद घालायची.आपल्या प्रेमळ हातांनी धावदोरा घालायची.माईआजीची गोधडी मग दिमाखात मिरवायची. माईआजीची गोधडी आपल्या कुशीत घेवून निजवायची.बागुलबुवापासून… ती सार्‍या मुलांना लपवायची.लेकरं मग गोधडीत गुडूप होऊन जायची.थंडीला तर खूप लांब लांब पळवायची. खरंतर माईआजी बाप्पाकडे गेली मागच्यावर्षी.हल्ली गोधडीपण हळवी होते जराशी.. आजीसारखीच सुरकुतलीय ती पण जराशी.जरा रंगही हल्ली फिका झालाय तिचा तरी आजीच्या मायेचं अस्तर… पांघरते लेकरांना           ©️®️Shraddha Sudame         Nagpur ( 8830784103)     ...