Posts

Showing posts from June, 2025

मेरे प्यार की धून

Image
मेरे प्यार की धून आज २१ जून “सुरपाखरू” गटात लेख लिहायला सुरुवात करायच्या आधी फेसबुकवर, इन्स्टाग्राम वर नेहमीची एक चक्कर मारली.तर लक्षात आलं आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.अनेक जणांचे योगासनं करतानाचे फोटोज, रील्स, ऑनलाइन योगा वर्ग सर्टिफिकेट्स झळकताहेत सकाळपासूनच. मी म्हटलं आपण तर यातलं काहीच केलं नाही.नमनाला घडाभर पाणी म्हणून जरा हात हलवावे,व्यायाम करावा म्हटलं आणि थोडं अजून पेज स्क्रोल केलं तर “ ए भावसाहेब तू योगासन करते का योगासन. योगासन ने प्राणायाम! मी रोज एक घंटा योगासन करते योगासन! आपल्याला कवा ताप नाय न् ब्लड प्रेशर नाय..सेव्हंटी एट पण माजे डोल्याला चष्मा नाय"हा पु .लं.च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तन काका मधील संवाद दिसला.एकदम फ्रेश मूड झाला. पुढे जाऊन अमिताभ बच्चनच्या “कुली”सिनेमातील योगा करता करता “अब मुंह खोलीये और मिरची मुंह में डालिये” पासून रेडिओ ऐकून ऑम्लेट बनवणारा अमिताभचा व्हिडिओ पाहून हसून हसून फेस योगा झाला.म्हटलं चला आपलं आजच्या दिवशी कणभर का होईना पण योगात योगदान! आता हे काय ..आज  संगीत दिवस पण आहे. “पंछियों की चहचहाट है संगीत सूखेपत्तों की सरसराहट है संगीत फुलों क...

डिमेन्शिया- हरवलेली माणसं

Image
   शेजारच्या बंगल्यात ती दोघंच रहात.मुलं परदेशी स्थायिक झाली होती.आमचा छान घरोबा होता.लहानपणी आम्हां मुलांना अंगाखांद्यावर खेळवलं होतं दोघांनी.नातवंडं, पोरं, सुना परदेशात असल्याने नेमकं आता उतारवयात दोघंच उरली होती एकमेकांसाठी.आईची,आमची एकतरी दिवसातून त्यांच्याकडे फेरी असायचीच.शांताआजी आणि आजोबा रोज दुपारी कलत्या ऊन्हाची झालर अंगावर घ्यायचे.जणू काही किरणांची दुलई पांघरायचे.खिडकीतून छान कोवळं ऊन आत यायचं.थंडीत पारा खाली गेला की दुपारचं ऊनही कोवळं वाटायचं. आजी फणीने केस विंचरत ,मग छानसा अंबाडा घालत ऊन्हात बसायच्या. त्यांचे निळसर झालेले डोळे ऊन्हात प्रिझमसारखे चमकायचे. निळ्या लोलकांतून सूर्यकिरणं परावर्तित  होऊन निरागस हास्य आजींच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर दिसायचं.मी गोडाचा शिरा आईने केलेला आजी आजोबांकडे घेऊन फाटकाच्या आत शिरतच होते आणि “आजही काय तेजःपुंज दिसतेय स्वीटहार्ट”असं आजोबा आजीला थट्टेने म्हणाले.तुमचं आपलं काहीतरीच म्हणत आजी पण लाजली.जणू हे नार्मल होतं दोघांसाठी. आजोबादेखील समोरच्या अंगणात आरामखुर्चीत रेलून ऊन अंगावर घेत वर्तमानपत्र वाचत बसले.पेपर वाचताना अर्धा तास...

बालिका वधू

   टेलिव्हिजनच्या कलर्स वाहिनीवर यायची ती मालिका समजला असाल तर नाही. ही नायिका मालिके मधील अजिबात नाही.. तर ही आहे खरी तुमच्या माझ्यासारखीच पण बालपण हरवलेली मला भेटलेली बालिकावधू. साधारण इयत्ता पाचवीत वगैरे मी असेन. दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होत्या शाळेला. साखरकारखान्यात नवीन गळीतहंगाम सुरु झाला होता. रोजच्या चार चार शिफ्ट असत कामगारांना. पहाटे ४ ते दुपार १२,१२ते ८, ८ ते ४ आणि जनरल शिफ्ट ७•३० ते ५•३०. प्रत्येक शिफ्ट बदलताना तीन भोंगे होत. सुट्टया असल्यामुळेच की काय त्यादिवशी पहाटेच्या पहिल्या भोंग्याला नेमकी जाग आली. बंगल्याच्या मागच्या व्हरांड्यात फेऱ्या मारणं सुरू होतं माझं आणि कारखान्याच्या बाजूने धूर येताना मला दिसला. सुरुवातीला वाटलं चिमणीचा धूर असेल. पण लक्षात आलं धूर वाढत चालला आहे. तेवढ्यात बाबांना जनरल ऑफीसमधून फोन आला होता कारखान्यात मोठी आग लागली होती आणि आजूबाजूलाच वसाहतीतील घरापर्यंत ती आग झपाट्याने पोहचत होती. बाबा वेगाने साखरकारखान्यात गेले. आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो. आमच्या साठी नव्हे पण ज्यांची घरे पाचटांपासून बनलेल्या चाळीत होती त्यांच्यासाठी. थोड्यावेळात क...

दरवळ

Image
“गुड्डी” मधील जया भादुरीची आठवण यावी असं अनेक वेळा माझ्या बाबतीत योगायोगाने घडलं बालपणी. सिनेमा सुरू होण्यापूर्वी थिएटर मध्ये ज्या इंडियन न्यूज , जाहिराती दाखवत त्याचं चित्रीकरण कारखान्याच्या परिसरात व्हायचं म्हणजे अपघात कसे टाळायचे किंवा आरोग्याची काळजीविषयक न्यूजवगैरे.तर एक शूटिंग मला आठवतं आमच्या घरीच त्या जाहिरातीतील युनिटमधील बायकामाणसं नऊवार लुगडी, शेतमजूर असं तयारी करून गावातून कारखान्यात शूटिंगसाठी रवाना करण्यात आल्या होत्या आणि मागोमाग आम्ही बच्चे कंपनी पण .मजा यायची त्यात भाग घेताना. तसंच आमच्या इथे साखरकारखान्यात गणेशोत्सव म्हणजे एकापेक्षा एक दर्जेदार मराठी नाटकांची पंधरा दिवस लूट असे.याचं आता महत्त्व कळतंय मोठेपणी पण लहान असताना कोण हे कलाकार , किती मोठी माणसं काही जाणीव नव्हती. एक गमतीदार अनुभव सांगते.गणेशोत्सवातील त्यादिवशी पण रोजप्रमाणे नाटक होते. आम्ही जेवण करून छान गजरा वगैरे असं तयार होऊन जाऊन बसलो.मी नऊदहा वर्षांची असेन, थोड्यावेळात नाटक बघता बघता झोपून गेले.जाग आली तेव्हा मला आईबाबा उठवत होते.पटकन चल म्हणत रंगभूमीच्या मागे नेत म्हणाले अर्धा तासाचा छोटासा रोल आहे तुल...

लोणच्याची बरणी

  केशवसुतांनी म्हटलंय “ खादाड असे माझी भूक .चतकोराने न मला सुख.मनास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे.” मंडळी ऋतूंप्रमाणे निसर्ग रंग बदलतो, बहरतो.निसर्गच काय आपलं स्वयंपाकघर देखील रंगीबेरंगी फळभाज्यांनी बहरत असतं.हिवाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतू अतिशय आवडीचे आहेत माझे. का माहितेय? तुमचे देखील असणारच. बरोबर ओळखलंत कारण या दिवसांत खाद्यपदार्थांची रेलचेल असते म्हणून आणि त्यात खास मनसोक्त लोणची आणि पापड करता येतात म्हणून .आणि जेव्हा मी केलेल्या लोणच्याला दाद मिळते तेव्हा तर खूप भारी वाटतं.मूठभर मांस चढतं अंगावर.  उन्हाळा म्हणजे कैरीचं लोणचं….मुरांबा, साखरांबा,पन्हं आणि हो कैरीची डाळ कशी विसरून चालेल! आंब्याच्या झाडाला मोहोर यायला लागला की लगेच लोणच्याच्या बरण्या खरेदी करणं अशी तयारी दरवर्षीच… ताज्या लाल मिरच्या बाजारातून आणायच्या, ऊन दाखवायचं , बाईकडून देठं खुडायची आणि लालचुटुक तिखट दळून आणायचं.केवढं हे बाळंतपण. हल्लीच्या मुलींना नाही कळायचं .हळकुंड दळणे.. हळदीचा तो सुवास..मी जात्यावर दळताना पाहिलंय आजीला आणि दळताना सुंदर ओव्या गाताना देखील. आमच्या बालपणी परीक्षेचा सिझन आणि आईने वा...

सवाई गंधर्व - एक आठवण

Image
   फर्ग्युसनलाच असताना केलेल्या अनेक दिव्य साहसांपैकी हे एक. दरवर्षीच डिसेंबर जानेवारीच्या थंडीचा कहर असताना सवाई गंधर्व महोत्सव ही दहा दिवसांची पुणेकरांसाठी संगीतमय मेजवानीच असते.त्यामुळे आम्ही त्या मौसमात न्हाऊन घ्यायचो. रोज रात्री आठ ते पहाटे सहा वाजेपर्यंत दिग्गज घराण्यातील शास्त्रीय गायक वेगवेगळे राग तल्लीन होऊन गात.अहाहा काय समा चढायचा. आम्ही शिकत असल्याने घरून जे काही आम्हाला मर्यादित पैसे मिळत त्यात आम्ही खर्च adjust करत असू.त्यामुळे सवाई गंधर्वची महागडी तिकीटे आणि पासेस आमच्या बसकी बात नही थी… लेकीन फेस्टिवल तो देखनाही था.. अब क्या करे असं आम्ही विचारात असताना एक खुशखबर कानावर उडत उडत आली.ती अशी की बहुतेक अरसिक लोकं भल्यापहाटे दोन वाजताच अर्ध्या कार्यक्रमातून निघून जातात त्यामुळे बसायला अगदी समोरची बैठक सहज मिळते.आम्ही लगेच रोज पहाटेचं आमचं ध्येय साध्य करण्याची योजना आखली.आमच्याकडे वाहनं नव्हती.त्यामुळे आम्ही rent ने सायकली करायच्या.साधारण पाच सहा किलोमीटर अंतर कापायचे म्हणजे साडेतीन वाजताच होस्टेलवरून निघावे लागणार होते. कारण त्या आधी लवकर शक्य नव्हते.तसं आम्ही दर रव...

#कूल माॅम

  नकळत आपल्या प्रत्येकाला एक टॅग लागलेला असतो.आणि तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आजूबाजूच्या व्यक्तींनी लावलेला असतो.जसं बोअरिंग पर्सन, डल, इंप्रेसिव लेडी,अरोगंट चाईल्ड. तसाच हल्ली कूल माॅमचा टॅग असणं आवश्यक झालंय.सलमान खान जसा Being Human चा टीशर्ट घालून फिरतो तसा आईनेदेखील Cool Mom चा ॲपरन चढवला एकदा की सगळ्या गोष्टी सोप्या होतात.आपण एक पाऊल पुढे आलं तर मुलंही एक पाऊल मागे येतात आणि दोन जनरेशन मधील गॅप कमी होते.तर यासाठी जादुई छडी घुमाकर ,मुस्कराकर बच्चों को झप्पी देकर प्रत्येकीने हा कूल माॅमचा शिरपेच खोचावा आपल्या मुगूटात. आई ही आई असतेच पण मैत्रीचं नातं निर्माण करणं तितकंच गरजेचं झालंय हल्ली.पूर्वी मुलांना आई वडील आणि इतर वडीलधारी माणसांचा धाक असे .पण हल्ली equations चेंज झालीयेत. त्यामुळे गृहिणी असो किंवा वर्किंग आई .त्यासाठी तिने एक दीर्घ श्वास घ्यावा, डोक्यावर बर्फ ठेवावा आणि आपल्या मुलांसारखं त्यांच्याबरोबर चील करावं. कारण त्यांना आपण एखाद्या गोष्टीसाठी “नाही”म्हटलं तरी ते खोटं बोलून, लपवून फॅन्सी गोष्टी try करतात कारण आजूबाजूचं वातावरण , मित्र मैत्रीणी आणि सर्वात महत्वा...

गमी

  राजास जी महाली  सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरही ना बोजा या झोपडीत माझ्या ही कविता आपल्याला शाळेत पाठ्यपुस्तकात होती.त्याचा अर्थ मराठीच्या बाईंपेक्षा गंगूबाईने मला शिकवला. माझ्या लहानपणापासून गमी अर्थात गंगूबाई आमच्याकडे होती. “गमी”हे आम्ही तिला दिलेलं नाव.जवळपास पंधरावर्ष ती आमच्याकडे काम करत होती.भांडीधुणी वगैरे.पण गंगूबाई आमची मोलकरीण होती हे म्हणताना जीभ अडखळते. कारण ती,तिची मुलगी आमच्या घरातील एक सभासदच होती जणू काय.तिचा पगार तो काय केवळ पंधरा रुपये महिना होता त्यावेळी.पण ती आनंदी आणि समाधानी होती.एका पायाने लंगडी असलेली गंगूबाई नऊवार, खणाची चोळी , कमरेला खणाचीच शिवलेली चंची ,कपाळावर लाल कुंकू अशी असायची. गंगूबाईच्या चंचीत वेगवेगळ्या कप्प्यात दडलेली असायची सुपारीची खांडं , तपकीरीची डबी. तिची मुलगी सुशीला इतर मैत्रींणींसारखीच माझी मैत्रीण होती.दिवाळीला बक्षीस ते काय केवळ एक खणाचं कापड. जास्त काही दिलं तर नाही म्हणायची.अतिशय स्वाभिमानी होती.नवरा दारूडा म्हणून सोडून दिलं होतं तिने आणि आपल्या मुलांना घेऊन एकट...

कहा गये वो दिन

Image
   फर्ग्युसन रोजनिशी भाग - 2 आनंदी - फर्ग्युसनला मला भेटलेली ही अजून एक मैत्रिण. आनंदी मणिपूरी होती.आनंदीचे वडील इंफाल विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख आणि महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आनंदी अतिशय हळवी होती.माझी होस्टेलवरची तर मैत्रिण होतीच शिवाय प्रॅक्टिकल्सची पार्टनर.सुरुवातीला मला वाटायचं हिला मराठी काही समजत नाही त्यामुळे मी सरांविषयी बिनधास्त बडबड करायची मराठीतून आणि एक दिवशी आनंदीने साॅलीड धक्का दिला.मला म्हणाली “ श्रध्दा आय नो मराठी.आय अंडरस्टॅन्ड व्हाॅट यू टाॅक” मी पुरती घाबरले होते पण तिने स्वतःहून वचन दिलं की मी तिच्यावर विश्वास ठेवू शकते असं.मग काय धमाल..मी नेहमी प्रोफेसर लोकांची मिमिक्री करायची.आनंदी हसून हसून लाल व्हायची आणि म्हणायची “श्रध्दा यू मेक मी लाफ,आय कान्ट स्टॉप लाफिंग.” आनंदी आणि तिचा भाऊ जुळी भावंडं होती. तिचा भाऊ तिला भेटायला आला की ती पटापट लिपस्टिकचा अजून एक थर लावायची अन् पळायची.बार्बी डाॅलसारखे गोल्डन केस, कपाळावर समोर आलेले आणि ओठांना लालचुटुक लिपस्टिक. आनंदीला आश्चर्य वाटायचं की मी लिपस्टिक लावत नाही ,मेकअप करत नाही याचं.या मणिपूरी अज...

कहा गये वो दिन

 कहा गये वो दिन फर्ग्युसन रोजनिशी भाग- 1 1)आपल्या सगळ्यांचाच काॅलेजचे दिवस हा सुंदर आठवणींचा असा ठेवा असतो ज्याचा सुगंध ठेवणीतील पैठणीसारखा असतो. ते दिवस होते मी एम.एस्सी.करत होते.फर्ग्युसन काॅलेजला त्यावेळचे. बहुतेकांचा हा गैरसमज असतो मास्टर्स करणार्‍या मुली म्हणजे स्टुडियस, बुकवर्म अशी काही धारणा घेऊन येणारी 90% मुलं मुली असतात किंवा पी.जी.करणाऱ्या तेही फिजिक्समध्ये,पुणे युनिव्हर्सिटीतून  म्हणजे हातावर मोजक्या लोकांच्यात  स्काॅलर स्टुडंट हा मान असे. याला अपवाद होतो मी आणि वर्षा.मी आणि माझी मैत्रिण नेहमी म्हणायचो सिनियर्स म्हणून काय सिरियस राहयचं का नेहमी? आम्ही डिस्टिंक्शन मिळवणाऱ्या गर्ल्स होस्टेलच्या अशा मुली ज्यांना खूप आवड होती कलेची, संगीताची, अभिनयाची.पण काय करणार आपली इमेज राखण्याकरता जुनियर्स् समोर खोटं बोलायला लागायचं. म्हणजे उदाहरणार्थ बालगंधर्व ला नाटकाला निघालेलो असताना पुस्तकं पर्समध्ये कोंबून न्यायचो. “कुठे लायब्ररीत?”आम्ही येस वगैरे उत्तर देत पटकन निसटायचो. ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीत जायचो आम्ही ,पण नेमकं जुनियर्स विचारायच्या त्यावेळी आम्ही सिनेमा,नाटक किं...

जरा विसावू या वळणावर

 जरा विसावू या वळणावर  आपल्याला वयाच्या पहिल्या वर्षापासून शिकवलेलं असतं की चालायचं कसं.ते मूल घरातील वडीलधार्यांचा हात घट्ट पकडून पडत धडपडत हळूहळू चालायला शिकतं.काही वर्षांनी शाळेत जातं. ससा आणि कासवाची गोष्ट ते मूल ऐकतं आणि मग धावायला शिकतं.अजून काही वर्षांनी स्पर्धांच्या रेसमध्ये धावायला लागतं. खरंतर लहान मुलापासून माणूस बनलेला हा किंवा ही धावपळ त्यांच्या अंगवळणी पडते.मग ही धावपळ आवडायला लागते.जणू धावपळीचं व्यसन लागतं.ही धावपळ शरीराबरोबर मनाची असते. जन्माला आल्यापासून आयुष्याची टाइम लाइन आपण गाठत असतो. स्थैर्य नको वाटतं.शांत बसणं काहीही न करता, चिंतन करणं, स्वतःच्या आयुष्याचा मागोवा घेणं हा विचारही शिवत नाही आपल्या मनाला.मुंबईच्या लोकलट्रेनसारखा धावत असतो प्रत्येक जण. कारण “ थांबायचं असतं”त्याला कुणी शिकवलेलं नसतं लहानपणी.  पण आपल्या प्रत्येकाला ज्याला त्यालाच “थांबायचं कुठे” हे ठरवावं लागतं. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की ब्रम्हचार्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यास हे मनुष्य जीवनशैलीचे चार टप्पे आहेत.यातील पहिल्या टप्प्यात अध्ययन मग दुसऱ्या टप्प्यात संसार प्रपं...

मनाचा आरसा

 मनाचा आरसा आपल्यापैकी बहुतेक जण बहुतेक वेळा निर्णय घेताना किंवा आपलं मत मांडताना अथवा काय चूक काय बरोबर हे ठरवताना द्विधा मनःस्थितीत असतात. शेक्सपियरच्या प्रसिद्ध नाटकातील हॅम्लेटचा डायलॉग “टू बी ऑर नाॅट टू बी” आहे.त्याप्रमाणे आपलं मन गोंधळून जातं. फिजिक्समध्ये “प्रकाशा”ची दुहेरी गुणधर्माची थेअरी असा सिध्दांत आहे.तशीच माणसंदेखील दुहेरी स्वभावाची असतात. किंवा दुहेरी व्यक्तिमत्त्वाची असतात.काहीजण परिस्थिप्रमाणे भिन्न वागतात तर काही नेहमीच.किंवा द्वंद्व सुरु असतं दोन विचारांचं किंवा एका माणसाच्या दोन मनांचं असं म्हणूया हवंतर. जसं मॅथ्समध्ये दोन व्हेरियेबल्स असतात X आणि Y तसं काहीसं आपल्या मनामध्ये दोन कप्पे असतात.जे आपल्याला दिसत नाहीत.एक X मन म्हणत असतं अमूक एक गोष्ट कर तर दुसरं Y मन म्हणतं नको करू. आपण रोज आरसा पाहतो .त्यात चेहरा दिसतो.मन नाही.किती सोपं झालं असतं ना जर आपल्या प्रत्येकाला मनाचा आरसा दिसला असता तर… हिंदी मूव्हीज मध्ये बर्‍याचदा हे दाखवतात त्या हिरो किंवा हिराॅइनची प्रतिमा हाऽ हाऽ हाऽ हास्य करत आरशात दिसत असते आणि बोलत असते त्या व्यक्तीशी.मागे म्यूझिक सुरु असतं ती ति...

सावली

  वयाच्या या टप्प्यात परत एकदा स्वतःला नवीन भेटताना…. सिंहावलोकन करताना ,फिरुन मागे वळून पाहताना…ओळख माझीच सांगताना… काय सांगू? प्रश्न पडलाय मनास… दरवर्षी स्वतःच्या वाढदिवशी नवीन काय केले आपण किंवा value addition काय केली विविध स्तरांवर असं आत्मपरीक्षण करण्याची एक सवय किंवा नियम आहे माझा.काय चुका केल्या, नवीन काय शिकलो वगैरे.कारण व्यक्तिमत्त्व विकास हा कधीच पूर्ण होत नसतो .ही एक process आहे खरं तर.या प्रोसेस मध्ये   किती ही रूपं एकाच व्यक्तीची…. मुलगी, बहीण, मैत्रीण, विद्यार्थिनी, टीचर, लेक्चरर. अशा विविध भूमिका रंगवताना आयुष्य ही एक रंगभूमी आहे तर कधी एक व्यासपीठ आहे ह्याची जाणीव होते.आयुष्याचा चित्रपट कसा आपणच दिग्दर्शित करतो याचं कोडं पडतं. खरी भूमिका तर आयुष्याच्या नवीन वळणावर बदलते.अगदी बरोबर ओळखलंत ..लग्नानंतर.आतापर्यंत फक्त नाव बदलत होतं पण विवाह बंधनात आडनावाबरोबर पुन्हा नवीन भूमिका…..घर बदलतं, शहर बदलतं, प्रथा, रिती , भाषा, माणसं सगळंच बदलतं.मैत्रीणी ही नवीन बनतात.बायको,सून,वहिनी हे रोल पार पाडताना कधीतरी तारेवरची कसरत होते प्रत्येकीची. इथंपर्यंत ठीक होतं रोल बद...

फॅमिली ट्री

  कुणी म्हणत होतं सोन्याची फुलं उधळायची असतात बरं का …तर कुणी सोन्याची पणती करायची आता.. पाळणा सजला होता. माळा लावून सजावट झाली होती. घरातील बायका नटून थटून मुरडत होत्या.अगं बाई गजरा राहिलाच की म्हणून एकमेकीला आठवणीने सांगत होत्या.पुरूषमंडळी हवं नको बघत होते. घरात सगळीकडेच आनंदी आनंद होता. चौथ्या पिढीचं आगमन झालं होतं. कारण घरात नवीन बाळ जन्माला आलं होतं.या बाळामुळे प्रत्येकाचंच वरच्या पोस्ट वर प्रमोशन झालं होतं.कुणाचं आत्या म्हणून, कुणाचं मामी म्हणून, कुणाचं मावशी म्हणून.या सगळ्यांसाठी गोड अशी भाची मिळाली होती तर दोघी विहीणींचं आजी म्हणून प्रमोशन झालं होतं.. ..त्यातली एक आई आणि दुसरी सासू ज्या आजी झाल्या होत्या आणि दोघा व्याह्यांचं आजोबा म्हणून त्यातले एक बाबा आणि दुसरे सासरे होते. या चौघा सिनियर सिटीझन्सला नात झाली होती.  आणि आमचं दोघांचं आई बाबा म्हणून प्रमोशन झालं होतं. आम्हाला गोड अशी मुलगी झाली होती. आमच्या कुटूंबामध्ये नवीन सदस्य आला होता आणि वंशवृक्षाला नवीन कोवळी फांदी . ही सगळी तिच्याच बारशाची गडबड सुरु होती.अरे हो.. मुख्य सभासद विसरलेच की सांगायला. आमच्या आजींना ....