मला भावलेल्या स्त्री व्यक्तिरेखा लता मंगेशकर काही महिन्यांपासून मी जेव्हा “मला भावलेल्या इतिहासातील स्त्री व्यक्तिरेखा” ह्या शीर्षकाखाली लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा लता मंगेशकर ह्या व्यक्ती विषयी लिहायचे हे अनेकदा मनात येऊन गेले. पण केवळ ह्यासाठी लिहिले नाही की इतिहासातील कुठे आहेत दीदी? त्या तर आपल्याबरोबर आहेत. छान गातायेत. आणि दुसरे कारण त्यांच्याविषयी लेख न लिहिण्याचा हे की त्या सामान्य स्त्री नाहीयेत तर त्या स्त्री रूपातील साक्षात सरस्वतीची अवतार आहे. दैवत आहेत. संगीत प्रेमी, तरुण, वृद्ध, बाळ गोपाळ यांची देव्हाऱ्यात वीणा घेऊन बसलेली गानसरस्वती. आणि अशा दैवताबद्दल माझ्यासारखी लहान, अतिसामान्य व्यक्ती काय लिहिणार? माझी वाणी मूक होते, अचंबित होते लताताई तुझे गाणे ऐकून! तरी आज मी तुझ्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केलाय..... आज सकाळी जी बातमी पाहिली की आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लतादीदी काळाच्या पडद्याआड…. आणि अचानक घड्याळ थांबल्यासारख झालं, तिथेच थिजल्यासारखं झालं… हे कसं शक्य आहे? देव्हाऱ्यासमोर जाऊन पाहिलं, सगळे देव आहेत की, सरस्वती ...