बाबा दगडाच्या पाटीवर अ आ ई गिरवताना, पाढे, उजळणी पासून.. अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासून हात धरून वळण लावणारा बाबा… गणवेषखरेदीपासून नवीन पुस्तकांच्या खाकी कव्हर पर्यंत बरोबर असणारा बाबा. आपल्या बालपणी सोसलेले चटके आपल्या लेकरांना बसू न देणारा, "कुणी घर देेता का घर "म्हणत आपल्या बालपणी अनाथालयात राहिलेला बाबा पोटच्या पोरांना मात्र सदैव तळहाताच्या फोडासारखा जपत आला.काय सांगू बाबा तुमचं बालपण तुमच्याकडून ऐकलं की अजूनही डोळे डबडबतात या लेकीचे ... कसं लिहू या चार ओळींत , डायरीतील एका पानावर जन्मापासून सारं काही जे एका बाबानं लेकरांसाठी केलं… शाळा ते काॅलेजपर्यंत हा वटवृक्ष सावलीसारखा असायचा सतत लेकीबरोबर असणारा बाबा… बघता बघता दिवसामागून दिवस , महिने , वर्ष भुर्रकन उडाली. आणि एक दिवस परकर पोलक्यातली ही लेकही माहेरच्या घरट्यातून उडाली. कळलंच नाही कधी प्रगतिपुस्तकावर सही कर...