कथा -
सोल मेट डिअर हजबन्ड , आज मला पत्र लिहायचा मूड आलाय. कारण म्हटलं तर काहीच नाही आणि म्हटलं तर बरंच काही.म्हणजे झालं असं…काल पुस्तकाच्या कपाटातून एक पत्र डोकावून बघत होतं..”लोकं लिहायला विसरली का नाती विसरली ?”,जुनं जीर्ण पिवळसर पत्र जणू मला विचारत होतं,“हल्ली माझा मीच झोपेत चालत असतो, जमलेली माझ्यावरची धूळ साफ करत असतो.पण तरी मोबाईल सारखा पाॅश दिसत नसतो;ओल्ड फॅशन वाटतो.”टपकन माझ्या डोळ्यातला पाण्याचा थेंब त्या पत्रावर पडला.पत्रांनी किती मैत्रिणी होत्या जोडल्या .किती आठवणी होत्या आपल्या या पत्रांत दडल्या. कसं सांगू पत्राला तुला नाही रे विसरले पण या मोबाईल मध्ये थोडी हरवले.म्हणून आज परत पत्र लिहायला बसले.आठवतात ना तू मला नि मी तुला लग्ना आधी लिहिलेली पत्रं.त्यावेळी मोबाईल तर नव्हताच पण लॅन्ड लाइन सुध्दा महाग वाटायचा.टेलिफोन बूथवरून करायचास तू कधीतरी फोन मला.त्यात तुझं डिफेन्स ट्रेनिंग. कडक शिस्तबद्ध. त्यामुळे फोनवरची काही मिनिटं तुझा आवाज ऐकून रडण्यात जायची.मग तू समजूत घालायचास.तुझी तब्येत बरी नसली तरी लपवत हसत बोलायचास. आपल्या दोघातलं अंतर खूप जाणवायचं फोनवर.पण पत्र लिहिताना अंतर कमी...