वेटींग रुम भाग - 4 आई काय? म्हणजे अनिकेतच्या आईबाबांनी सांगितलं की काय माझ्या आईबाबांना! मलाच सरप्राईज दिलं यांनी …मी खूप खुश झाले आणि म्हटलं ठीक आहे मी पण शांत राहून अक्टींग करते.आता कळलं अनिकेत का फोन करत नव्हता.मी आईसमोर लाजून म्हटलं हो,होणार मी सूनबाई! आणि त्या रात्री अनिकेतच्या नि माझ्या भावी संसाराची स्वप्नं बघत झोप लागली. सकाळी उठल्यावर आई म्हणाली उद्या मंजूमावशी आणि तुझा राजकुमार येणार आहेत रितसर बोलायला.मी दचकलेच.मंजूमावशी तुझी मैत्रीण, काही दिवसांपूर्वी आले होते सगळेजण? “हो” आई म्हणाली .तेव्हाच तू त्यांना तिच्या मुलाला मोहीतला खूप आवडली. तिचा सिमल्यावर पोहोचल्यावर मला फोन होता, मी म्हटलं एकदा तुझा होकार आहे का बघते …पण तू तयार म्हटल्यावर रात्री बोलले मंजूशी.येतायेत ती लोकं उद्या.मी भोवळ आली म्हणून मटकन बेडवर आधाराने बसले. “आई, हे काय केलंस तू?माझं प्रेम नाहीये गं तुझ्या मंजूच्या मुलावर”. तर आई म्हणते “हो गं सगळे असंच म्हणतात, पण लग्नानंतर होतं प्रेम.” मी हे काय करून बसले देवा …वाचव मला.मला वाटलं की अनिकेतचे आई बाबा बोलले. अशी कशी मी गृहीत धरलं ? ते काही ...