मुरांबा तू नं खूप cuteआहेस ओठांचा चंबू करून मला आपल्या चिमुकल्या हातांनी तिने मिठी मारली… मी म्हटलं अगं वेडाबाई खूप लाडात येतेस हं हल्ली असं काय गं मम्मा… तू माझी फ्रेंड आहेस ना Cool …. माझी बार्बी, माझा Teddy ये आता फार होतंय हं हसलो खूप मग दोघी… माझ्या पोटी जन्मलेली अगं माझी लेक आहेस की मला एकटं सोडून गेलेली आई… पुन्हा माझ्या उदरी आलेली अगं रडतेस कशाला उगाच बघ ना किती आनंद पेरला आहेस तू माझ्या आयुष्यात ऊबदार कुशीत म्हणून तर सुखावतो आपण एकमेकींच्या आपण दोघी…आई आणि लेक घट्ट बाॅन्ड नात्याचा…. जणू काही ….मुरांबा … @ Shraddha ( अनामिका)