Posts

Showing posts from August, 2024
Image
  तो आणि ती   त्याला वाटतं पाऊस म्हणजे रबरबाट..चिखल तिला वाटतं पाऊस म्हणजे सुखद गारवा…नि हिरवळ तो म्हणतो पाऊस म्हणजे ट्रॅफिकचा गोंधळ…छत्र्यांची गर्दी ती म्हणते पाऊस म्हणजे ओलावलेलं मन…गारव्यात सुखावलेली पावलं तो म्हणतो पाऊस म्हणजे चिखलात माखलेले चपला आणि बूट ती मात्र म्हणते पाऊस म्हणजे पागोळ्या, डोलणारी झाडं तो म्हणतो पाऊस म्हणजे सर्दी, ताप , खोकला… ती म्हणते पाऊस म्हणजे मोरांचा टाहो, सृजनाची सुरुवात … तरी तो तिला पावसात न विसरता भेटायला येतो…छत्रीत स्वतःला जपतो खिडकीतून अंगणात एकटक पहात रहातो पावसाला नि सरींत चिंब होऊन गारव्यात सुखावणाऱ्या तिला….                Shraddha ( अनामिका)
Image
  ब्लँक काॅल खूप आठवण येत होती म्हणून … तिने मोबाईलवर त्याचा  नंबर डायल केला….पण… आजही असंच झालं ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने भावना आधी जाऊन पोहोचल्या तिच्या स्पंदनांचा वेग शब्दांपेक्षा  आधी भिडला त्याच्या काळजाला आणि त्याच्या श्वासांमधील चढउतार  वाचला तिनेही अलगद… असेच गेले काही क्षण, मिनिटं… दोघंही एकमेकाला अनुभवत.. एका अदृश्य वलयात… आता फोनवर बोलण्यासाठी शब्दांची गरज उरली नव्हती… काहीवेळाने लाजून हसत  तिने न बोलताच फोन बंद केला..           ©️ Shraddha (अनामिका)
Image
  अग्निपरीक्षा गुनाह है शायद उसका खिलखिलाकर हंसना…बाते करना…जैसे सृष्टी के सारे नियम तोड डाले हो उसने… कितनी आसानी से  उसे बदनाम कर देते हो…मानो कयामत आ जायेगी अगर नजर उठा के जवाब दिया उसने..मंजूर नही ना आप को उसका स्वाभिमानी होना.. स्वतंत्र होना? मै बात कर रही हू… उस शक्ती की, उस देवी की, उस साध्वी की, जो बलिदान की मूरत है…ऐसे ही साधारण स्त्री की …. स्त्री कोई भी स्तर की हो… नही समझ सकते हो ना तुम उसके पीडा को… नही समझ सकते हो जौहर की ज्वाला को …नही समझ सकते तुम उसकी इच्छा को, मजबुरी की वजह को आत्मा का समर्पण ही उसका चरित्र है…लेकीन अपने चरित्र का प्रमाण क्यू बार बार उसे देना है?पृथ्वी के गोद मे क्यू बार बार समाधी लेना है? मर्यादा की रेखा का क्यू स्त्री को ही सम्मान हमेशा रखना है?छू न सका रावण सीता को..क्यू की मर्यादा पुरूषोत्तम भी हमारे राघव थे .. फिरभी संदेह से तुम देखते रहे सीता को दानव नही मानव हो ना तुम? क्यू भूल जाते हो अखसर? पिता, पती, पुत्र के रूप हो न तुम अगर नाज है ना तुम्हे पुरूष होने पर? तो तुम भी एक अग्निपरीक्षा देना… कृष्ण भगवान सा अवतार लेकर …  केशव सा रुप...