अशी ही एक कविता

सुरवंट आपल्या कोषातून बाहेर आला

त्याचं फुलपाखरू झालं

 नि कविता जाहली…

अंतरंगाचे दालनं, चोरकप्पे, खण 

सारं उघडून मनाने बाहेर डोकावलं

नि कविता जाहली…

भित्रा ससा असलेलं मन

भावविश्वात रमलं

नि कविता जाहली…

बुध्दीने बंद केलेली कवाडं

भावनांनी उघडली..

साखळदंडात कैद मन

हिंदोळे घेऊ लागलं

नि कविता जाहली…

आत्मचरित्र नाही पण अंतरीच्या

छटांची प्रतिबिंब लेखणीत उमटली..

नि कविता जाहली…

        @ श्रध्दा

          ( अनामिका)

Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की