मुरांबा

तू नं खूप cuteआहेस 

ओठांचा चंबू करून

 मला आपल्या चिमुकल्या

हातांनी तिने मिठी मारली…

मी म्हटलं अगं वेडाबाई 

खूप लाडात येतेस हं हल्ली

असं काय गं मम्मा…

तू माझी फ्रेंड आहेस ना

Cool  ….

माझी बार्बी, माझा Teddy

ये आता फार होतंय हं

हसलो खूप मग दोघी…

माझ्या पोटी जन्मलेली 

अगं माझी लेक आहेस

की मला एकटं सोडून 

गेलेली आई…

पुन्हा माझ्या उदरी आलेली

अगं रडतेस कशाला उगाच

बघ ना किती आनंद

पेरला आहेस तू माझ्या आयुष्यात

ऊबदार कुशीत म्हणून तर

सुखावतो आपण एकमेकींच्या

आपण दोघी…आई आणि लेक

घट्ट बाॅन्ड नात्याचा….

जणू काही ….मुरांबा …

            @ Shraddha 

               ( अनामिका)



Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की