गणेश विसर्जन
माझी लहान मुलगी 7,8 वर्षांची असेल तेव्हाची आठवण झाली. आमच्याकडे गणपती स्थापना झाली त्या दिवसापासून गणपती बाप्पाच्या भोवती
असायची.कोविडच्या काळात स्वतःच्या चिमुकल्या हाताने गणपतीची मुर्ती तिने माझ्या मदतीने केली होती.रोज अथर्वशीर्ष मी म्हणत तिने गणरायाला अभिषेक करायचा.हा नित्यक्रम असे.
मग आला विसर्जनाचा दिवस. आम्ही तलावावर विसर्जन करण्यासाठी गेलो तर बाई साहेब रडू लागल्या.बाप्पा जाणार म्हणून डोळे डबडबलेले होते तिचे आणि त्यामुळे माझेही.शेवटी झाले विसर्जन.
घरी आलो तर ती गालात हसत होती , म्हटलं काय केलं तू ? नक्कीच काही तरी आहे! तर मला म्हणाली तू आधी promise कर कोणाला सांगणार नाही .मी म्हटलं promise. मग हळूच लपवलेला उंदीर काढून दाखवला आणि तिच्या चेहर्यावरील आनंद गगनात मावेना.मला म्हणाली बाप्पा उंदीर वर बसून travel करतोना. आता येईल बाप्पा आणि मी तर देणारच नाहीये त्याला उंदीर. मग आपल्याच कडे रहावं लागेल बाप्पाला! तिच्या बालीश सुखाला मी त्यादिवशी हिरावून नाही घेतलं पण दुसर्या दिवशीपासून रोज समजावत गेले."अगं ज्याच्या नावातच श्री आहे , आपल्या नवीन कार्याची सुरुवात आपण श्री गणेशा करून, म्हणून करतो तो आपल्याबरोबरच असतो .तू स्कूल मध्ये अभ्यास नीट करते त्यावेळी तुला तो help करत असतो पण तो आपल्याला दिसत नाही.त्याला मात्र आपण सगळे , आपले problems दिसत असतात."
माझं समजावणं तिला हळूहळू पटत गेलं.आणि तिच्या बालमनाने गणपती बाप्पाचं आपल्यासोबत अस्तित्व मान्य केलं.
दरवर्षी आता ती आनंदात विसर्जन मिरवणुकीत सामील होते.
रोज देवघरातील गणपती बाप्पाला Bye करत ती स्कूलला जाते.आपल्यालादेखील दहा दिवस आरती, पूजा आणि बाप्पाची सवय होते पण तो चराचरात आहे हे मान्य केलं की सोपं होतं.
@श्रध्दा देशपांडे सुदामे
खूप सुंदर एकदम realistic aani touching कथा. खूप मार्मिक अन् सोप्या शब्दात व्यक्त केली. अभिनंदन.
ReplyDelete