चलो इक बार फिर से
परवा अचानक तो भेटला …अनामिका कुणीतरी हाक दिली…मागे वळून थांबले ..ओळखलं?35 वर्षांचा काळ लोटला होता…… तरी मी मनात म्हटलं विसरलेच कुठे होते तुला ? आणि मग त्याने रस्त्यावरच मनमुराद गप्पा मारल्या…पूर्वी मारायचा तसंच. तो म्हणाला छान दिसतील आहेस आजही तू ……मी मात्र डोळ्याखालची काळी वर्तुळं लपवण्याचा प्रयत्न करत होते…. हे लक्षात आलं असावं त्याच्या कारण पुढे तो म्हणाला तुला मेक अप किंवा ओठांवर लाली कधी लावायची गरजच नाही पडली…तुझी बोलण्याची मिठास ओठांवर असते नेहमीच न्यारी… मी अवघडत होते…तो मात्र बोलतच होता…चंदेरी बटांमुळे केसांच्या व्यक्तिमत्त्व तजेलदार झालंय ग तुझं…आजही तुळशीवृंदावन समोर रांगोळी असं पाहिलं की अनामिका तूच येतेस डोळ्यांसमोर….
मी घड्याळ पाहिलं अन् म्हटलं उशीर होतोय…नंतर बोलू.. केव्हा? सांग ना..मी नुसतंच हसले.. जाऊ या का डिनरला? धाडकन त्याने विचारलं…
सांग ना येशील का candle light dinner ला.sea shore war किंवा चांदणं पांघरलेल्या आभाळाखाली कुठेही मंद वार्याच्या झुळूकेबरोबर…दूर.सारंगीचे सूर ऐकू येताहेत…लाटांचे हेलकावे त्यावर ताल धरतायेत..
मी मनात म्हटलं किती कल्पनेत जगतो हा…तो लगेच म्हणाला..हे काही वय आहे का
एक fantasy म्हण माझी हवं तर
काय crazy वाटतात का माझ्या कल्पना?
तसं म्हण हवं तर ..पण सांग ना..
कंटाळा आलाय आळणी , मिळमिळीत झालंय सारं
काही तरी भारी करु या? Thrilling?
आठवतंय काॅलेजात असताना सायकलवरून येताना चिंचा पाडायचो .. मी पण म्हटलं …चालत्या बैलगाडीतून ऊसाची मोळी धावत जाऊन आणायचास .. माझ्यासाठी पहिला बेंच धरुन ठेवायचास…होमवर्क देखील करुन ठेवायचास…
आणि जोशीकाकूंच्या बागेतील गुलाबाची फुलं?
काय कमाल करायचास तू! फाटकावरून आवाज न करता उडी मारुन जायचास काकूंच्या बागेत नि मला आवडतात म्हणून रोज गुलाब आणायचा… तो पुढे म्हणाला..
कसे भुर्रकन गेले ना दिवस? किती बिनधास्त होतो ना आपण? मग आता का नाही ? असं काय बदललंय? आपण मोठे झालो की उगीचच विचार करतो ना? मी काहीच उत्तर दिलं नसलं तरी ..मन म्हणत होतं ….
चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनों…न मै तुम से कोई उम्मीद रखू दिल नवाजी की….न तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज नजरों से…
©️ Shraddha
Comments
Post a Comment