विकेन्ड 


 तुळशीबागेत जाऊया ना मग? 

 नको खूप गर्दी असते वीकेंडला…

त्यापेक्षा हाँगकाँग लेन जाऊ…

मी काय म्हणते. …

“सुजाता” मस्तानी हं पुढच्या रविवारी 

नको “वैशाली”ची साऊथ इंडियन काॅफी घेऊ..

 ऐक ना माझं..“बाल गंधर्व”ला नाटक पाहू..

अगं..”अलका” ला Ghost लागलाय 

 वीकेंडला तो पाहू…

दावणगिरी डोसा  मात्र ठरलं हा सिनेमानंतर…

ऐक ना कॅम्पातील कयानी बेकरीत जाऊ…

 या  वीकेंडला सायकलींग …पर्वती…

खाली उतरल्यावर  अमृततुल्य चहा…

नाही हं धन्वंतरी ऊसाचा रस घेऊ …

नेक्स्ट संडे वाॅटर पार्क ला जाऊ

काहीही काय …नाही हं …पानशेतला जाऊ …

:

:

:

काहीतरी खुपतंय…बरंच काही चुकतंय…

बरंच काही विसरतंय…नाही सारंच विस्कटलंय

तारा जुळेनात.....सूर हरवू लागलेत....

आता…उशीर व्हायच्या आत

भेटूया ना प्लीज … फक्त दोघं एकमेकाला…

वाचूया ना पुन्हा…तू मला अन् मी तुला…

तू आणि मी…. जाऊया ना ....डेटवर

शोधूया ना मी तुला नि तू मला …

पापण्यांच्या आड….खोल…

दोन श्वासातील अंतरात….मंद स्मितात…

आठवूया ना चुकून झालेला…

पहिला वहिला… एकमेकांना स्पर्श….

बोलवूया ना पुन्हा…..

चंद्र, तारका,गारवा…. साक्षीला…

तू म्हणशील तर दुपारचं ऊनही…

पहाटेचं दव….रिमझिम पाऊस …

व्हायोलिनचे सूर…

तू माझ्यात अन् मी तुझ्यात….

जाऊ या ना डेटवर....

            @ Shraddha ( अनामिका)







Comments

  1. वा, सुंदर !
    छान आहे विकेंड.👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की