बकुळीचा गजरा थकलीस का ग कुसुम? जेव्हा आजी नातवांना खाली स्कूल बसपाशी सोडून आल्या तेव्हा नानांनी आपल्या बायकोला विचारलं. आजींनी हसून मानेनेच नाही म्हटलं. घर रिकामं झालं होतं.अकरा वाजेपर्यंत नुसती गडबड. सून, मुलगा दोघांची ऑफीसात जायची तयारी.त्यात नातू आणि नात हायस्कूलात आता त्यामुळे वाढलेला अभ्यास. त्यांची तयारी,डबे.सगळ्या कामांना बाई होती .त्यामुळे कुसूम आजी आणि नानांना तो भार पडायचा नाही.पण आताशा दोन बेडरूम फ्लॅट लहान पडू लागला होता. मुलांना अभ्यासाकरता स्वतंत्र खोली असणं गरजेचं झालं होतं.त्यामुळे सून मुलगा यांत रविवारी वरचेवर हल्ली वाद होत.घरातील शांतता लोपली होती.नोकरी असूनही दोघांची मुंबईत मोठं घर घेणं अशक्य होतं.त्यात मुलांच्या ट्यूशन्सची अमाप फी,महिन्याचा खर्च, आजी आजोबांची औषधं अवघड होत चाललं होतं.हे कुसूम आजी आणि नानांना स्पष्ट दिसत होतं. आपलं ओझं होऊ लागलंय किंवा आपली अडचण आपल्या मुलाच्या संसारात होतेय असं त्यांना जाणवू लागलं.आणि म्हणूनच गेले कित्येक दिवस चाललेल्या या ओढाताणीला त्यांनी पूर्णविराम दिला होता.अगदी कोणालाही न कळू देता काळजावर दगड ठेवून एक निर्णय ...
Comments
Post a Comment