नेमकी कशी माझी कविता

साधी सुधी सात्विक कविता….

स्वच्छंद, निरागस…

कोवळ्या,अल्लड भावनांची

माझी कविता…

खळाळत्या झऱ्यासारखी ..निखळशुभ्र वनमालेसारखी फुलापानांनी नटलेली…

मनाच्या हिंदोळ्यावर डुलणारी

माझी कविता…

तपस्विनीसम …तेजःपुंज 

माझी कविता

शांत, अलिप्त, गंभीर…

मनमोहक… विविध रुपातील

माझी कविता…

 रुपकात, अलंकारात, वृत्तात, यमकात

सजलेली कविता…

उपमा लेवून थिरकली कविता

नयनकमल झाले डोळियांचे

फुलांची पखरण जणू झाल्या चांदण्या

ओठ जाहले ...देठचि पारिजातकाचे….

 वदन गमे ..…जसे रुप चंद्रमाचे

थोडी अनोळखी भासली… मजला

 माझ्याच लेखणीतील कविता..जेव्हा

अलंकार आभूषणे ल्याली कविता

 वीणेतून अवतरली ..सरस्वती देवता 

माझीच कविता. ..

मंदिरातील देवदासी …ही कविता

स्वर्ग लोकीची जणू अप्सरा ..ही कविता

तुमच्या माझ्या हृदयातील सम्राज्ञी…

ही कविता

              @ Shraddha 

                 ( अनामिका)










 



Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की