काव्य दिनानिमित्त एक कविता

 वाचशील का तू 


तुझेही डोळे शोध घेताहेत ना..

सत्यात लपलेल्या असत्यतेचा…

वाचून बघ मग भयभीत मनाला …

हळूच उलगड पदर मनाचा

उसवून झालर पुन्हा एकदा….

सांग वाचशील ना तू पुन्हा एकदा

कोंडलेला अंधार तमाचा…

अज्ञात वाटेवरील पाऊलखुणां

संवादामधील निशब्द मौनता….

श्वासांमधील नीरव शांतता…..

शाश्वतामधील अशाश्वतता…

प्रसन्नेतेमधील उदासीनता…

कोर्‍या कॅनव्हासवरील

अदृश्य चित्रांची… रंगहीनता…

वाचशील ना तू..

शून्यामधील अर्थशून्यता अन्

पोकळीतील व्याप्त…. गूढता…

ओढीतील अलिप्तता अन् 

बंधनातील मुक्तता…

तुला न भासे शब्दांची भाषा

असतात ना तुजपाशी हमेशा

तुझ्या मनाच्या कविता…..

       @ Shraddha 

          ( अनामिका)












Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की