कवी ग्रेस स्मृती प्रीत्यर्थ
26 मार्च महाकवी यांचा स्मृतिदिन
कवी ग्रेस स्मृतिप्रीत्यर्थ 🙏🏼
लताबाईंनी आपला स्वरसाज चढवलेली आणि पंडीत हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली ही कविता...
कवी ग्रेस यांची कविता : भय इथले संपत नाही | Poet : Grace
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती
देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब
संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने
ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई
कवी - ग्रेस

Comments
Post a Comment