तुझी वाट बघताना

पावसाचा थेंबही नव्हता…

तरी निसर्ग भिजवत होता

बेधुंद,बेफिकीर  तरंगणारं मन होतं….

आठवणींचा परिमल होता…

बागेत मोगरा फुलला होता…

सप्तरंगांची उधळण करणारा नभी इंद्रधनु होता

छत्री न घेता….भिजवत मनाला मनसोक्त 

त्या ओल्या उन्हात 

रात्रभर पाऊस पडून गेल्यावरच्या…

त्या पावसानंतरच्या उन्हात 

श्वास उमलून टाकणाऱ्या त्या कोवळ्या उन्हात…मी चिंब 

झाडांवर ते पडताना..

दिसत होता हिरवा रंग उन्हाचा 

अन् गुलाबी रंग मनाचा

ओंजळीत घेऊन भरलं उन्हाला 

जणू अलगद पालवी फुटली होती रित्या मनाला

सार्‍या सृष्टीला जसा मोहर आलेला ….

असं ओलेतं ऊन ..त्याचा बिलगलेला स्पर्श

 अंतरंग ओलंचिंब करणारा …

तुझ्या येण्याची चाहूल जशी …

                         @ Shraddha

Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की