परीसस्पर्श 



आजही याद येते… ती मंतरलेली रात्र ….

नुकतीच येऊन गेलेली वळवाची सर

 शिंपणामुळे दरवळणारा मृदगंध…. रातराणीचा सुवास..  अन् रूंजी घालणारा तुझा श्वास …

त्तुझा झालेला परीसस्पर्श ….

जणू सतारीची तार छेडताना होतो …

तसा माझ्या तनूचा लयबद्ध कंप….की

देहातून उतरणारी नक्षी…

तुझ्या नि माझ्या अंतरांना जोडणारी…

हृदयात उसळणाऱ्या अमृत धारा…

मध्येच लख्ख प्रकाशात आपलं

अस्तित्व दाखवणार्‍या सौदामिनीचा लोळ

मी कोमेजून जाईन की काय 

या भयाने आवेगात मला 

तुझ्या विळख्यात ऊब देणारी

तुझी मिठी….आणि त्यात कैद

तू आणि मी….आजही…

फुलाफुलांत पेंगते आहे ती  रात….

      @ Shraddha (अनामिका)



Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की