तो आणि ती

 

त्याला वाटतं पाऊस म्हणजे रबरबाट..चिखल

तिला वाटतं पाऊस म्हणजे सुखद गारवा…नि हिरवळ

तो म्हणतो पाऊस म्हणजे ट्रॅफिकचा गोंधळ…छत्र्यांची गर्दी

ती म्हणते पाऊस म्हणजे ओलावलेलं मन…गारव्यात सुखावलेली पावलं

तो म्हणतो पाऊस म्हणजे चिखलात माखलेले चपला आणि बूट

ती मात्र म्हणते पाऊस म्हणजे पागोळ्या, डोलणारी झाडं

तो म्हणतो पाऊस म्हणजे सर्दी, ताप , खोकला…

ती म्हणते पाऊस म्हणजे मोरांचा टाहो, सृजनाची सुरुवात …

तरी तो तिला पावसात न विसरता भेटायला येतो…छत्रीत स्वतःला जपतो

खिडकीतून अंगणात एकटक पहात रहातो पावसाला नि सरींत चिंब होऊन गारव्यात सुखावणाऱ्या तिला….

               Shraddha ( अनामिका)




Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की