ब्लँक काॅल

खूप आठवण येत होती म्हणून …

तिने मोबाईलवर त्याचा 

नंबर डायल केला….पण…

आजही असंच झालं

ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने

भावना आधी जाऊन पोहोचल्या

तिच्या स्पंदनांचा वेग शब्दांपेक्षा 

आधी भिडला त्याच्या काळजाला

आणि त्याच्या श्वासांमधील चढउतार 

वाचला तिनेही अलगद…

असेच गेले काही क्षण, मिनिटं…

दोघंही एकमेकाला अनुभवत..

एका अदृश्य वलयात…

आता फोनवर बोलण्यासाठी

शब्दांची गरज उरली नव्हती…

काहीवेळाने लाजून हसत 

तिने न बोलताच फोन बंद केला..

          ©️ Shraddha (अनामिका)






Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की