मीराबाई 

मीराबाईचा जन्म कुडकी गावात मेर्टा (राजस्थान) येथे 1498 मध्ये मेर्टा येथील राठोड राव दुदा यांचा मुलगा रतन सिंह यांच्या घरी झाला. मीराचे वडील रतन सिंह राठौर हे जहागीरदार होते आणि आई वीर कुमारी होती. मीराचे पालनपोषण तिच्या आजोबांनी केले. त्यांची आजी भगवान श्रीकृष्णाची निस्सीम भक्त होती ज्यांची देवावर अपार श्रद्धा होती.

विवाह-

मीराबाईचा विवाह 1516 मध्ये मेवाडच्या महाराणा संगाचा मोठा मुलगा भोजराज सिंह याच्याशी झाला. भोजराज हा त्यावेळी मेवाडचा युवराज होता.

दुःखाचा डोंगर-

लग्नाच्या एक-दोन वर्षानंतर, 1518 मध्ये, भोजराजला दिल्ली सल्तनतीविरूद्ध युद्ध करावे लागले. 1521 मध्ये महाराणा संगा आणि मुघल शासक बाबर यांच्यात युद्ध झाले. खानवाची लढाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात राणा संगाचा पराभव झाला. खानवाच्या युद्धात राणा संगा आणि त्याचा मुलगा भोजराज मरण पावला.

पती भोजराजच्या मृत्यूनंतर मीराबाई एकाकी पडल्या. पतीच्या हौतात्म्यानंतर तिने स्वतःला भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये मग्न केले.

 सावत्र दीर विक्रम सिंग (विक्रमादित्य) याला मीराबाईची संतांसोबत उठून बसण्याची आणि भजने गाण्याची कृती आवडली नाही. त्यांनी मीराला समजावले की आम्ही राजपूत लोक आहोत आणि हे सर्व काम आमचे नाही.

कृष्ण भक्ती -

पण मीराबाईने त्यांचे ऐकले नाही आणि कृष्णाच्या भक्तीत तल्लीन राहिली. मीराला कृष्णाच्या भक्तीपासून रोखण्यासाठी विक्रमादित्यने अनेक प्रयत्न केले.

विक्रमादित्यने मीराला विष देऊन तिला साप चावण्याचाही प्रयत्न केला. एके दिवशी त्याने मीरासाठी एका ग्लासमध्ये विष आणि एका भांड्यात साप पाठवला. मान्यतेनुसार, विक्रमादित्यने पाठवलेला साप फुलांचा हार बनला. मीराबाईला मारण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने अयशस्वी झाले.

एकरूपता , सदाचार -

आपण सगळे मीरेच्या कृष्ण भक्तीला जाणताच . संत म्हणून देशभर नावारूपास आलेली, आपल्या भजनांनी ,अभंगांनी जगालाही दुःखं विसरायला लावणारी मीरा काय सांगते ? सदाचार, एकरूपता ही शस्त्र माणसातील असूरी वृत्तीचा वध करून शकतात.म्हणूनच मला मीरा हे दुर्गेचं आगळं वेगळं रुप भासते.

तानपुरा आणि भक्ती अशीही अस्त्रं- 

तलवार, त्रिशूल धारण केलेली , महिषासुर मर्दिनी दुर्गा त्या काळाची गरज होती.पण कधी कधी काळानुसार शस्त्रं बदलावी लागतात, असूरी प्रवृत्ती मिटवून जगावर आपली प्रतिमा उमटवावी लागते .हेच हाती तानपुरा घेऊन संत मीराबाईने अभंग गाताना आपल्या स्वरातून उमटवले.अशा शांत, साध्वी दुर्गेच्या रुपास कोटी कोटी प्रणाम! 🙏🏼🙏🏼

       

          ©️®️Shraddha Sudame 

                ..8830784103



Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की