वेटींग रूम

               भाग - 2

ग्रॅज्युएशन झाले . मास्टर्स करण्या आधी अनिकेत आणि मी भेटायचं असं ठरवलं. त्याला एक महिना ब्रेक होता.महाशय आता लेफ्टनंट अनिकेत झाले होते.त्याचे आई बाबा दिल्लीत होते . म्हणून मी दिल्लीला यावे.असं ठरवलं.तो आई बाबांना भेटवणार होता.पण मी अजून माझ्या घरी काही बोलले नव्हते.नाही म्हणायला जवळच्या मैत्रिणींना माहित होते.दिल्लीला आम्ही तिघी मैत्रीणी ट्रीप म्हणून जाणार होतो.घरून परवानगी मिळाली. शाॅपिंग, ब्युटीपार्लर जय्यत तयारी सुरु झाली.आणि अनिकेतसाठी सरप्राईज गिफ्ट. काय घ्यावं बरं…शर्ट, टाय, टी शर्ट, स्वेटर, वाॅच काही कळत नव्हतं.शेवटी वाॅच घ्यावं असं पक्क केलं आणि घेतलं.पॅकिंग झालं. रात्री मनसोक्त फोनवर गप्पा मारत असताना, किती रोमॅन्टिक झालाय अनिकेत जाणवत होतं आणि धडधड खूप वाढली होती.कसं नजर मिळवणार होते मी त्याच्याशी ! अनिकेतचं स्वप्न बघत डोळा लागला.सकाळीच आईचा ओरडा “उठा महाराणी दिल्ली काबीज करायची आहे .” मी ताडकन उठले .प्रवासाचा दिवस उजाडला होता.दुपारची ट्रेन होती .वेगाने सगळं आवरलं. मैत्रीणी आणि मी चढलो ट्रेन मध्ये.माझ्या अनिकेतला भेटायला चालले होते मी. आज मैं ऊपर आसमां नीचे असं झालं होतं.

दिल्ली स्टेशनवर गाडी आली माझी नजर लाल टी शर्ट, सहा फूट उंच, धिप्पाड व्यक्तिमत्त्वाकडे वळली.पाठमोरा होता तो.मी चालत तिकडे जात होते आणि त्याचे कान माझ्या पायातील पैंजणांचा वेध घेत होते.मी थांबले तसा तो वळला. त्याच्या निळसर घाऱ्या डोळ्यांत त्याने मला सामावून घेतलं होतं.ओठांवर तेच लाघवी स्मित. माझ्या देहाची जणू सतार व्हावी अशी मी कंंपीत होत होते , किती आकर्षक दिसत होता अनिकेत ! त्याने डोळे मिचकावले तसं मी लाजून खाली पाहिलं.मैत्रिणी मस्त एन्जॉय करत होत्या क्या सीन है …

सगळे जण त्याच्या कारमध्ये बसलो.मी पुढे त्याच्या शेजारी.त्याने ड्रायव्हिंग करताना हळूच हात दाबला. माझ्या पूर्ण अंगभर रोमांच….

थोड्यावेळात घर आलं अनिकेतचं.मोठा बंगला आर्मी वाल्याचा. आई बाबा त्याचे वेल्कम करायला उत्साहाने बाहेर आले.

छान वाटत होतं सारं.मी नमस्कार करायला वाकले तर प्रेमाने त्याच्या आईने जवळ घेतलं.खूप छान असं ते कुटुंब वाटलं. एका मिनिटात फाॅर्म्यालिटीचं वातावरण नार्मल झालं.

मी अनिकेतच्या आईबाबांना खूप आवडले होते.कौतुक करत होते सारखं.मलाही लाडवून घ्यायला आवडत होतं.मला वाटलं एवढे ब्रिगेडियर होते अनिकेतचे बाबा. मला वाटलं खूप अटिट्यूड असेल , मला तसं दडपण आलं होतं पण आमच्यात मस्त बाॅन्ड तयार झाला दोन दिवसातच.रात्री जेवणानंतर गप्पा , मूव्हीज, जुनी हिंदी गाणी, त्यांनी युध्दांत अनुभवलेले थरारक प्रसंग असे भरपूर विषय असायचे. अनिकेतला आणि मला दिवसभर फिरायला वेळ असायचा.त्यात आमचं प्रेम ऊतू जात होतं.किती बदल झाला होता अनिकेतमध्ये…एकदम मॅच्युअर्ड असा.लाइफची त्याची थेअरी, टफ ट्रेनिंग नंतर वाढलेली जबाबदारी हे ऐकताना एकीकडे अभिमान वाटत होता त्याच्याबद्दल आणि भीती सुध्दा. सिव्हिलियन्सपेक्षा खूप धोक्याचं असं आयुष्य होतं या लोकांचं.आपल्या देशाची सुरक्षा, परकीय आक्रमणं, कधीही इमर्जन्सी यायची असं अनिकेत सांगत होता.आपल्याला नेहमीच एन्जॉय करायला मिळेल असं नाही. तुझी तयारी आहे ना या सगळ्याला? तो मला हसत म्हणाला .मी म्हटलं, हो रे ….मी आनंदी असेन कायम तुझ्याबरोबर.

बघता बघता आठ दिवस असे निघून गेले आणि दोन दिवसात आपण परत जाणार या विचाराने मी अस्वस्थ झाले.दोन रात्री मी आणि अनिकेतने एकमेकांना बिलगून, हातात हात घट्ट धरून, भविष्याचे स्वप्नात रंगत घालवल्या.त्याच्या आईबाबांनीही सहा महिन्यात रितसर ते माझ्या घरी येऊन मागणी घालतील आणि मग एंगेजमेंट वर्षभरात लग्न असं ठरलं.आपल्या भावी सुनेकरता खूप काही घेऊन ठेवलं होतं त्यांनी.त्यातील आता काही ड्रेसेस, ज्वेलरी घेऊन जाताना अनिकेतचा प्रेमाचा दरवळ नेते बरोबर असं समजून त्या वस्तू बॅगेत भरल्या.मोठ्या मुश्किलीने डोळ्यांत आलेलं पाणी लपवलं.अनिकेत स्टेशनवर आला बरोबर.त्याचा हात सोडवत नव्हता.पण फक्त सहा महिने असं तो म्हणाला आणि चेहर्‍यावर हसू आलं.

बाय म्हणताना दोघांच्या नजरेत उद्याची स्वप्नं होती. सिग्नल मिळाला …गाडीने स्टेशन सोडायला सुरुवात केली आणि माझ्या मनाने एकत्र आयुष्याची सुरेल स्वप्नं जोडायला….

 क्रमशः

    ©️®️ Shraddha (अनामिका) 

             8830784103


Comments

  1. दुसऱ्या भागात देखील उत्कंठा ताणून ठेवली आहेस.
    लग्नाच्या आणा भाका घेतल्या दोघांनी मग अचानक काय झाल असेल असे विचार थैमान घालत आहे.
    दिल्लीच्या रम्य मनमोहक आठवणी दिवस रात्र सतावतात.
    खरी मजा आता काय होणार यात आहे.
    Keep it up श्रध्दा.
    सुंदर कथानक आणि तितकेच उत्कंठा वर्धक.

    ReplyDelete
  2. पुढे काय होणार असा विचार मनात येतो आणि तो पुढचा भाग येइपर्यंत वाट पाहत राहावे लागेल.
    नक्कीच वेगळा विषय आहे.
    एकाद्या वेब सिरीज सारखे वाटते आहे.
    छान , मस्त.
    खूप शुभेच्या
    अजिंक्य.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की