वेटींग रुम 

भाग - 3

पुण्यात परत आले दिल्ली ट्रीपवरून. मी खुश आहे पाहून आईला पण छान वाटत होतं.अर्थात माझ्या आनंदाचं रहस्य अजून तिला माहीत नव्हतं. अनिकेतचे आई बाबा सरप्राईज देऊ असं म्हणाले होते , त्यामुळे माझी इच्छा असूनही मी सांगू शकत नव्हते.

आल्यावर दोन दिवसांनी काॅलेजात जाऊन एम.एस्सी ला ॲडमिशन घेतली.आठ दिवसांत रुटीन सुरू झालं .

अनिकेतशी त्याची सुट्टी संपेपर्यंत रोज रात्री फोन व्हायचाच. फक्त सहा महिने …इंतजार …तो चिडवायचा.

माझ्या दोन मैत्रिणींची लग्न झाली. माझ्याकडे अजूनतरी तो विषय आईबाबा काढत नव्हते त्यामुळे देवाचे आभार मानत होते.

एकदिवशी अनिकेतचा दुपारी अचानक फोन आला.ऐकून धक्काच बसला.पाकिस्तानने जम्मू हवाई तळावर ड्रोन हल्ले केले. युध्द सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे अनिकेतला तातडीने रवाना व्हायचे होते. काळजी घे.आता कधी बोलशील? माझा प्रश्न तसाच राहिला कारण तिकडून फोन डिस्कनेक्ट झाला.मी अंधारी आली असं वाटून कसंबसं सोफ्यावर बसले.तोंडाला कोरड पडली होती.

आई विचारत होती काय झालं? कुणाचा फोन होता? मी म्हटलं माझ्या परीक्षेचा…आयुष्यातील...

न समजून आई विचारत होती " काय "? 

यंत्राप्रमाणे हालचाली सुरु होत्या माझ्या.सतत टी.व्ही. समोर असायचे.न्यूज बघत. काॅलेजात मन लागत नव्हतं.भारतानेही आक्रमणास प्रत्युत्तर म्हणून आज रात्री पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र साठ्यांवर बाॅम्ब हल्ला करायचं अशा बातम्या येत होत्या.

देवासमोर मी अखंड नंदादीप तेवत ठेवला होता.

रोज नवीन दिवस नवीन आशा घेऊन येत होता.पण अनिकेतशी बोलणं होत नव्हतं.बघता बघता दोन महिने उलटले.

 एक दिवस आमच्याकडे आईची शाळेतील सिमल्यातील मैत्रीण आपल्या फॅमिलीबरोबर आली. तिचे यजमान, मुलगा जो डाॅक्टर होता , मुलगी इंजिनिअरिंग करत होती असे सगळेजण.छान लोकं होते.त्यांच्याबरोबर आऊटींग म्हणून खूप फिरलो . तेवढाच माझा मूड जरा फ्रेश झाला.ते गेल्यानंतर परत अनिकेतचे विचार रुंजी घालू लागले.ठीक असेल ना तो? त्याला माझी आठवण येत असेल का?

आता काॅलेजची लास्ट सेमिस्टर आटोपलं की काय करायचं ? नोकरी ? 

आणि अनिकेतचा त्या रात्री फोन आला. 

वाॅर वगैरे निवळलं होतं त्यामुळे धोका नाही आता म्हणाला.पण प्रमोशन झालं होतं त्याचं त्यामुळे कामाचा व्याप, वेळा सगळं अनिश्चित झालंय म्हणाला.त्याचा स्वर उत्साही अजिबात नव्हता. मला खूप रडू येत होतं.मी भेटूया ना आपण एवढंच म्हणत होते.अनिकेतने बोलतो नंतर म्हणत फोन कट केला.माझ्या काळजात खंजीर खुपसल्यासारखं वाटलं मला.पण एकीकडे मन म्हणत होतं काही लपवत होता का अनिकेत? त्याची तब्येत ठीक असेल ना?असं विचार करत डोळा लागला.

सकाळीच आई एकदम खुश होती. म्हणाली अभिनंदन आता काय सूनबाई होणार कुणीतरी….

     क्रमशः

    ©️®️Shraddha (अनामिका)

      8830784103










Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की