वेटींग रुम
भाग - 4
आई काय? म्हणजे अनिकेतच्या आईबाबांनी सांगितलं की काय माझ्या आईबाबांना! मलाच सरप्राईज दिलं यांनी …मी खूप खुश झाले आणि म्हटलं ठीक आहे मी पण शांत राहून अक्टींग करते.आता कळलं अनिकेत का फोन करत नव्हता.मी आईसमोर लाजून म्हटलं हो,होणार मी सूनबाई!
आणि त्या रात्री अनिकेतच्या नि माझ्या भावी संसाराची स्वप्नं बघत झोप लागली.
सकाळी उठल्यावर आई म्हणाली उद्या मंजूमावशी आणि तुझा राजकुमार येणार आहेत रितसर बोलायला.मी दचकलेच.मंजूमावशी तुझी मैत्रीण, काही दिवसांपूर्वी आले होते सगळेजण? “हो” आई म्हणाली .तेव्हाच तू त्यांना तिच्या मुलाला मोहीतला खूप आवडली.
तिचा सिमल्यावर पोहोचल्यावर मला फोन होता, मी म्हटलं एकदा तुझा होकार आहे का बघते …पण तू तयार म्हटल्यावर रात्री बोलले मंजूशी.येतायेत ती लोकं उद्या.मी भोवळ आली म्हणून
मटकन बेडवर आधाराने बसले. “आई, हे काय केलंस तू?माझं प्रेम नाहीये गं तुझ्या मंजूच्या मुलावर”. तर आई म्हणते “हो गं सगळे असंच म्हणतात, पण लग्नानंतर होतं प्रेम.” मी हे काय करून बसले देवा …वाचव मला.मला वाटलं की अनिकेतचे आई बाबा बोलले. अशी कशी मी गृहीत धरलं ? ते काही नाही मी सगळं खरं सांगून टाकणार. “ आई माझं अनिकेत वर प्रेम आहे.आम्ही लग्न करणार आहोत” पासून मी दिल्लीत काय झालं , त्याचे आई बाबा सगळं सांगितलं.हे ऐकून आई म्हणाली, “अगं अनामिका किती गोंधळ घातला तू…आधी का नाही सांगितलंस मला? आता मी बाबांनी जवळपास त्या लोकांशी सगळी बोलणी केलीत.”
मी तडक बाबांशी जाऊन बोलले.माझी बाजू ऐकून बाबांचं ब्लडप्रेशर वाढलं.तातडीने हाॅस्पिटलमध्ये ॲडमीट
करावं लागलं.डाॅक्टरांच्या मते नाजूक तब्येत झालीये.कुठलाही धक्का बसेल असं वागू नका. माझ्यावर दुःखाचा डोंगर पसरला होता.ना अनिकेतशी काॅन्टॅक्ट होत होता ना त्याच्या आई बाबांशी.मंजूमावशीकडील सगळेजण आले.बाबांना हाॅस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाला असला तरी फार नाजूक तब्येत होती त्यांची.आईने मला समजावलं की
मी खंबीरपणे योग्य निर्णय घ्यावा.आणि मी तो घेतला. अनिकेतला विसरण्याचा आणि मोहीतला स्वीकारण्याचा. आमचं एंगेजमेंट झाली आणि चार महिन्यांत लग्न . आईबाब ,मोहित कडील सगळेजण खुश होते मी सोडून.परिस्थितीने माझ्या आयुष्याचा निर्णय घेतला होता.
दहा वर्ष पूर्ण झाली होती संसाराला माझ्या. आणि आज असा अनिकेत पुन्हा भेटला होता…वेटींग रूम मध्ये.
खूप प्रश्न पडले होते…जे अनुत्तरीत होते आजही
तो सध्या काय करतो…कुठे असतो…
रात्रभर स्मृतींना उजाळा देत…
हातात हात गुंफत…चहाच्या वाफेवर
ऊबदार स्पर्श दोघंही अनुभवत..
एकमेकांना वाचत….नजर चोरत
हरवलो होतो भूतकाळात….
जो रम्य होता….जो फक्त दोघांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्नांचा होता…
आर्मीत..दिल्लीत पोस्टिंग होतं त्याचं….
त्याचे दोन्ही पाय त्याच जम्मू युध्दात
निकामी झाले होते.म्हणूनच माझ्यासमोर आला नाही त्यावेळी.प्रेम म्हणजे त्याग हे सिद्ध केलं होतं अनिकेतने .प्रचंड आदर वाटत होता त्याचा.
अजूनही एकटाच होता….आयुष्यात एकीवरच प्रेम केलं म्हणाला तेव्हा अश्रू आवरले तरी किनार ओलांडून वाहिलेच….रडतेस काय अशी..
या अशाश्वत आयुष्यात आठवणीच तर शाश्वत आहेत….
नकळत थोडावेळ डोळा लागला….
त्याने खांद्यावर अलगद आधार दिला होता….
जाग आली ती ट्रेन च्या आवाजाने..
माझीच आहे …..ट्रेन…तो म्हणाला
नि माझा हात सोडवून घेत …नजर टाळत बॅग घेऊन….वेटींग रुम बाहेर अदृश्य झाला…
मी धावत पळत वेटींग रूमबाहेर…
ट्रेन सुटली होती ..त्याचा हलणारा हात आणि
हसरा चेहरा…कितीही डोळे पुसले तरी धूसरच दिसत होते….हुंदका आवरून एक श्वास घेतला
जो त्याने दिला होता….
आज परत एकदा शाश्वत आठवणींनी
माझी ओंजळ भरून गेला होता…तो…
©️®️Shraddha (अनामिका)
8830784103
समाप्तः
🙏🏼🙏🏼कमेंट्स मध्ये कथेच्या बाजूला आपले अभिप्राय द्यावेत.

खूपच मन हेलावून टाकणारी ,हृदयस्पर्शी कथा लिहिली. आयुष्यात अस बरेचदा होत.
ReplyDeleteआपण कुणाच्या दबावात, अन्य कोणत्याही कारणाने काही निर्णय घेतो.आपल्या आयुष्याशी
तडजोड करतो.
काही वेळ मी त्या विश्वात च गेलो आणि अनामिकेला अनुभवलं.
काय चूक काय बरोबर हे विचार करायला लावणारं कथानक अदभुत आहे.
तुझ्या लिहिण्याच्या, वाचकांच्या मनात
उत्कंठा शिगेला पोहचविण्याचे कलेला सलाम.
Keep it up.
Wishing you a glorious success in
Literature field.