उरूवी

ही कहाणी आहे एका स्त्रीची…उरूवीची…उरूवीच्या उत्कट प्रीतीची.कर्णाच्या जन्मजात वेदनांवर

फुंकर घालणाऱ्या, कर्णाचे भाग्य 

खंबीरपणे स्वीकारणाऱ्या कर्ण पत्नीची.

एका बहिष्कृत राणीची.

पुकेय देशाची राजकन्या उरूवीची.

कर्ण प्रेम - 

हस्तिनापूरच्या स्पर्धेच्या आखाड्यात तिने कर्णाला पाहिलं.त्याचं उंच, धिप्पाड, कणखर शरीर, त्यावर तळपणारी कवचकुंडलं,अर्जुनाच्या शरकौशल्याला आव्हान देणारा श्रेष्ठ धनुर्धारी. 

पाहताक्षणी उरूवी त्याच्या प्रेमात पडली.आणि तिच्या ध्यानीमनी वसला कर्ण, तिचा ध्यास बनला कर्ण.

उरुवी झाली कर्णपत्नी. कर्णाची द्वितीय पत्नी.

पित्याची लेक -

राजघराण्यातील इतर मुलींना जेव्हा आदर्श राजकुमारी बनण्याची शिक्षण दिलं जात होतं तेव्हा उरूवी मात्र युध्दभूमीवरील जखमी, असहाय्य, अपंग सैनिकांची सेवा करत असे.ती वडीलांना विचारे की इतरांची आयुष्य चिरडून तुम्ही यशाच्या वल्गना कशा करू शकता? क्षत्रिय असूनही उरूवी फार वेगळी होती .आपल्या वडिलांना राजाला ती म्हणाली सारं जग ज्याचा तिरस्कार करतं आहे त्या कर्णावर माझं प्रेम आहे आणि मी त्याव्यतिरिक्त कुणाला वरमाला घालणार नाही.संतापाने पुकेय नरेश उत्तरला कर्ण सूतपुत्र आहे आणि तू क्षत्रिय कन्या.

 उरूवीचे स्वयंवर -

अखेर तो दिवस उजाडला.राजकुमारी उरूवीचा विवाहसोहळा.कौरव, पांडव , भीष्म, कुंती, द्रौपदी , ऋषींनी मांडव भरला होता.राजमाता कुंतीला वाटत होते अर्जुनाला परत नववधू मिळणार. पण उरूवीने वरमाला कर्णाला अर्पण केली होती.कृष्णाने संतप्त राजा महाराजांना शांत केले.आणि उरूवीच्या निर्णयाचा सन्मान करण्यास सांगितले.अशारितीने राजकन्या उरूवी कर्णाची एका सूतपुत्राची पत्नी म्हणून नावाजली जाऊ लागली.

कर्ण उरुवी - 

विवाहानंतर उरुवीला कर्णाची दुसरी पत्नी म्हणून अनेक दिव्यांना सामोरे जावे लागले.पहिली पत्नी वृषाली, कर्णाला भाऊ शोण , आई वडील आणि पहिल्या पत्नीची मुले …पण उरूवीचं प्रेम कर्णावर प्रचंड होतं त्यामुळे ती खूष असायची. 

 समाजाने वाळीत टाकलेली पत्नी- 

हस्तिनापुरात गेल्यानंतर उरूवीला पितामह भीष्म भेटले.तुझा पती कौरवांना मिळाला .ज्यामुळे चूक आणि बरोबर यातील भेद जाणून घेण्याचं सामर्थ्य तू गमावून बसशील.दुर्योधनाला अर्जुनाविरूध्द ठाम उभा राहणारा योध्दा मिळालाय ज्याच्याशी तू विवाह केला आहेस.कर्णासारखा श्रेष्ठ योध्द्याला वाईट त्रिकुटापासून( दुर्योधन, दुःशासन, शकुनी)दूर ठेव उरूवी.

भीष्म म्हणाले कर्ण अर्जुनाविरूध्द म्हणजेच सत्याच्या विरूध्द कधीच जिंकू शकणार नाही .पितामहांचं म्हणणं पटलं असल्याने गप्प झालेली उरूवी तरीही मनोमन खंबीर राहिलेली उरुवी.

 दुर्योधन आणि उरुवी - 

इंद्रप्रस्थावर अकस्मात हल्ला चढवून नेस्तनाबूत करावं असा कर्णाचा मानस आहे.दुर्योधन उरूवीला सांगत होता तेव्हा त्याला “ कर्ण कुठल्याही नात्याने तुमच्या कुटूंबाशी बांधलेला नाही.त्याला ह्या हाडवैरापासून तुमच्या दूर ठेव. तू जाणीवपूर्वक कर्णाला अंगदेशाचं राज्यपद बहाल केलंस, स्वतःच्या अंकीत केलंस, तू नीचपणाचा कळस आहेस, अर्जुन कर्णाच्या शत्रुत्वाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केलास” असं ताडताड धमकवणारी हिंमतवान उरूवी.

कर्णाला दुर्योधनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारी - 

दुर्योधन विषवल्ली आहे त्याच्यापासून कर्णा तू दूर रहा.तो सत्तापिपासू आहे, त्याने पांडवांनी वैर करून तुला मोहरा बनवलाय, तू कौरव नाहीस , अंगदेश देवून तुझा आत्मा, देह दुर्योधनाने काबीज केलंय , तुला चांगलं वाईटातला भेद त्याच्यामुळे कळेनासा झालाय असं उरूवी समजवत असतानादेखील “तो माझा मित्र आहे, योध्दा म्हणून माझी कदर करणारा फक्त दुर्योधन आहे.” कर्ण उत्तरला.ते ऐकून असहाय्य कर्णाची भावना समजून घेणारी सहनशील उरूवी.

द्रौपदीला सन्मान देणारी उरुवी -

शकुनीच्या कूट नीती मुळे द्यूतात हरलेले पांडव कौरवांविरुध्द द्रौपदीला सुध्दा हरतात , त्यावेळी भरलेल्या सभेत दुर्योधन,दुःशासन इतकाच कर्ण तिच्या वस्त्र हरण आणि द्रौपदीच्या अपमानाला जबाबदार म्हणून त्याला दंड देण्यासाठी गर्भवती असतानादेखील त्याचा त्याग करून पित्याकडे परतणारी मानी स्त्री उरूवी.

राजमाता आणि सूर्यपुत्र कर्णाची माता कुंतीला उदार मनाने माफ करणारी उरूवी.

भीष्म, कृष्ण सगळ्यांकडे युध्द होऊ नये, कर्णाचे प्राण वाचावेत म्हणून गयावया करणारी उरूवी.

शेवटी अठरा दिवस व रात्री चाललेल्या  

कौरव पांडव युध्दात कर्णाच्या मृत्यूने एकाकी झालेली आणि श्रीकृष्णाला “खरंच युध्दाची गरज होती का ? “असा भाबडा प्रश्न विचारणारी उरूवी शांतपणे कृष्णास “कर्णाच्या देहास तूच अग्नी द्यावास” असं विनवणी करणारी खंबीर उरूवी.

दुर्गेचं असंही रूप समस्त स्त्रियांसाठी..

खंबीर, सहनशील ही अस्त्र आणि शस्त्र ल्यालेल्या या दुर्गेला उरूवीला

 शतशः नमन🙏🏼🙏🏼

         ©️ Shraddha Sudame 

              8830784103








Comments

  1. एका माहित नसलेल्या unknown व्यक्तिमत्वाची ओळख सुंदर सुबक रित्या करून दिल्या बद्दल जितके आभार मानावे तितके थोडेच. अत्यंत सुलभ सोप्या शब्दात वर्णन करण्याची हातोटी
    लाभलेली आहे श्रद्धा तुला.
    अभिनंदन कौतुक करावे तितके कमीच.

    ReplyDelete
  2. प्रथम मी आभार मानतो, महाभारत मधील एक सुंदर वक्ती जी सर्वोतोपरी आपल्या घराला सभळण्याचा आटोकाट प्रयत्न करते, बऱ्याच लोकांना माहीत पण नाही, आशच नवनवीन व्यक्ती बद्दल आम्हाला अजून सांगावे ही इच्छा.
    खूप आभार.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की