वेटींग रुम 
भाग - 1

ट्रेन सहा तास डिले झाली होती.
रात्रभर ते पहाट स्टेशनवरील वेटींग रुममध्ये काढायची या कल्पनेनेच कसंतरी झालं...खरंतर काही तासांपूरता आश्रय तिथे….अशाश्वत..
सारंच क्षणभंगुर….
सभोवताली अनोळखी चेहरे, 
अचानक ओळखीची हाक आली.अनामिका….
एक husky आवाज , एकेरी साद….
वळून पाहिलं आणि मनात प्रचंड वादळं उठलं
तो ….हो तोच…माझा … अजूनही पूर्वी इतकाच उत्साही... मोहक स्मित ओठांवर…आणि मी मॅग्नेटिक फील्ड मध्ये कधी ओढले गेले त्याच्या कळलंही नाही.
अचानक पडदा सरकावा तसा… सरसर जणू कॅलेंडरची पाने कित्येक वर्षं मागे पलटली आणि मी रम्य भूतकाळात शिरले. काॅलेजचा पहिला दिवस होता.रंगीबेरंगी ड्रेसेस मधली सुंदर मुलं मुली.सगळेच अनोळखी होतो एकमेकांसाठी. 
काही जणी मुली, काही मुलं स्वतःहून पुढे होऊन ओळख करून घेत होते.पण मी अलिप्त होते आणि तोही.दुसरा दिवस काॅलेजचा…
 तो आला, कालच्याच बेंचवर बसला. मला stare करतोय असं जाणवायचं पण मी न रागावता जणू त्याला मलाही आवडतंय तुझं न्याहाळणं असं मूक संमती देत होते.साधारण आठ दिवस असाच अबोल संवाद झाल्यावर एक दिवशी चुकून टकरावलो एकमेकांना आणि साॅरी असं दोघंही गडबडून बोललो आणि मग खूप हसलो.पण मग तेव्हापासून रोज ठरवून काॅफी साठी भेटू लागलो.घट्ट मैत्री हळूहळू प्रेमात बदलत होती .हे दोघंही समजलो होतो आणि मग व्हॅलेंटाइन डे ला चक्क प्रपोज केलंच त्याने.मग काय रोझेस चा जणू वर्षाव होत होता माझ्यावर.
अनिकेत आता माझा बाॅय फ्रेंड झाला होता ऑफिशियली.हॅन्डसम तर होताच पण रुबाबदार, Manly अनिकेत soft spoken, caring होता.” माझ्याशी लग्न करशील” असं किती innocent पणे त्याने विचारलं होतं.मी पटकन हो असं उत्तर दिलं होतं.
आधी एज्युकेशन पुर्ण करायचं .दोघांनी ठरवलं.मला खूप काही करिअर असं नाही पण post graduation तरी करायचं होतं.आणि अनिकेतला डिफेन्स सर्व्हिसेस…आता कुठे आम्ही 11th सायन्स ला होतो.दोन वर्ष पटकन गेली .रिझल्ट आला .अनिकेतला छान मार्क पडले होते .त्याचं डिफेन्स अकॅडमी मध्ये सिलेक्शन झालं होतं.आणि पुढील शिक्षणाकरता तो महिन्याभरात अरूणाचल ला रवाना होणार होता.मी याच काॅलेजात ग्रॅज्युएशन करणार होते.त्यामुळेच माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. इतके दिवस न भेटता आम्ही कसे राहणार होतो?
पण मोठ्या हिमतीने समजावलं मनाला आणि दोघंही हात सोडवत एकमेकाचा 
टाटा करत वळलो विरुद्ध दिशांना.
आता काॅलेजचा अभ्यास,मैत्रीणी,पेंटिंग क्लासेस असं मी दिवसभर रमू लागले आणि रात्री अनिकेतशी फोनवर बोलणं.खूप भारी वाटायचं.
पण हळूहळू रोजचा फोन एक दिवसाआड होऊ लागला .कारण अनिकेतला डिफेन्स सर्व्हिसेस चं ट्रेनिंग जाम थकवत होतं.भल्या पहाटे उठून 
तो दिवसभर पुरता डाऊन व्हायचा. 
मी पण हट्टीपणा न करता त्याला समजून घेत होते. मग वीक मधून एकदा बोलायचं असं ठरलं. तास दोन तास पोटभर गप्पा आणि प्रेमाचे लाजाळू संवाद.
आठवडाभर मग हेच आठवत मी 
खुश असायचे.पत्रंसुध्दा लिहायचे.
एक वर्ष भरकन गेलंदेखील.
अनिकेत आता वर्कलोड ने जास्त टायर्ड 
होऊ लागला.महिन्यातून एकदा बोलायचो आम्ही.मी पण युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह झाल्याने बिझी झाले होते.
                   क्रमशः वाचा.
          ©️®️Shraddha(अनामिका)

 

Comments

  1. वा, छान सुरुवात केली, पुढे काय होणार असा नक्की वाचणारा विचार करतो. आतले contnet पण छान लिहिलं आहे.असे नवीन विषय नेहमी आणत जा.हे नेहमीपेक्षा नक्कीच वेगळे आहे.
    धन्यवाद.. अजिंक्य.

    ReplyDelete
  2. दोघांची भेट झाली , प्रेम पण झाल आणि नंतर
    ट्विस्ट आला आणि मुलाची एज्युकेशन आणि जॉब साठी transfer zali. दोघांची ताटातूट झाली.
    आता अचानक waiting room मध्ये भेट झाली
    पुढे काय याची उत्कंठा तू ताणून ठेवलीस.
    खूप छान उत्कंठा वर्धक कथानक.
    पुढच्या भागात काय होणार ही उत्कंठा ताणून
    ठेवली.
    सुंदर सोप्या शब्दात सुंदर उत्कंठा वर्धक कथानक .त्या बद्दल अभिनंदन.
    Keep it up.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की