भानुमती


दुर्योधनाची पत्नी भानुमती. प्रथम पत्नीचे अकाली निधन झाल्यानंतर तिच्याच बहिणीशी द्रोणाचार्यांनी दुर्योधनाचा विवाह करून दिला.तीच ही भानुमती कुंभोज देशाची राजकन्या.

नावडत्या राजाशी विवाह आणि त्यानंतरची जबाबदारी विलक्षण ताकदीने भानुमतीने आयुष्यभर पेलली.

दुर्योधनाच्या दुर्गुणांमुळे कदाचित तिचं वागणं सर्वांशी सौहार्दपूर्ण होतं.नेहमीच अतिशय प्रसन्न, उत्साही अशीच भानुमती होती.दुर्योधन पांडवांचा द्वेष करतो हे ती जाणून होती तरी तिला हेही माहीत होतं की दुर्योधन उत्तम प्रशासक, शूर योध्दा आणि प्रेमळ पिता आहे.

विकृत पतीची पत्नी -

एकीकडे भानुमतीला दुर्योधनाचे विकृत, दुराग्रही रुप दिसत असताना आपण हतबल आहोत , त्याला थांबवू शकत नाही याचा खेद, खंत होती.तर दुसरीकडे पत्नी म्हणून आपण त्याच्या पापांचे वाटेकरी आहोत याची लाज वाटे.

द्रौपदीच्या वस्त्र हरणात तर दुर्योधनाने सगळ्या मर्यांदांचं उल्लंघन केलं होतं,त्याची असूरी वृत्ती, त्याची अधोगती याने कोंडमारा झालेली भानुमती कुणाकडे मन मोकळं देखील करू शकत नव्हती.

कर्णाची मैत्री - 

भानुमती आणि कर्ण यांच्यात सोंगट्यांचा डाव नेहमी रंगत असे आणि दुर्योधन सुध्दा त्यांच्या मैत्रीला कधी मज्जाव करत नसे.

माता भानुमती - 

भानुमती आणि दुर्योधनाचा एक पुत्र होता .लक्ष्मण त्याचं नाव.उच्छृंखल दुर्योधनाचा पुत्र मात्र सौम्य, मितभाषी, अशक्त होता. इतर मुलाप्रमाणे तो धावपळीचे खेळ खेळत नसे , वयाच्या मानाने अति गंभीर असलेल्या आपल्या पुत्राच्या या मनःस्थितीला आपण जबाबदार आहोत असं भानुमतीस वाटे.जे सर्वस्वी खोटे होते.

उरूवीची मैत्रीण - 

कर्ण पत्नी उरूवीशी भानुमती मैत्रीण म्हणून वागे.आपली घालमेल तीच समजू शकते हे तिला माहीत होतं .कारण दोघीही समदुःखी होत्या .कर्ण दुर्योधन मैत्री आणि कुरुक्षेत्र याचे परिणाम दोघीही जाणून होत्या.

असं असूनदेखील भानुमती सहवासात येणाऱ्या प्रत्येकावर मायेचा भरभरून वर्षाव करे.आपला कुणी अनादर करू नये , आपल्याला प्रत्येकाने नावाजायला हवं अशी आस भानुमतीला होती.कारण 

ती दुर्योधनाची पत्नी असली तरी त्याच्या दुष्ट हेतूंपासून अनेक कोस दूर होती.

पण आपणही अशा दुर्गेची आठवणही ठेवली नाही .महाभारतात कधीही भानुमतीचा उल्लेख नाही.

धोरणी भानुमती -

कुरुक्षेत्राच्या युध्दात सगळे कौरव व दुर्योधन मृत्युमुखी पडल्यानंतर भानुमती धोरणात्मक रितीने आपली सुपुत्र लक्ष्मणा आणि श्रीकृष्ण पुत्र साम्बा यांचा विवाह लावला आणि आयुष्यभर हरत आलेली बाजी अखेरीस भानुमतीने जिंकली.यावरून हिंदीमध्ये एक म्हण प्रसिद्ध झाली ती अशी- 

कही की ईंट कही का रोडा भानुमतीने कुनबा जोडा " म्हणजे हरलेली बाजी जिंकणं.

अशा साक्षात धोरणी आणि दूरदृष्टी असलेल्या रूपातील दुर्गेस त्रिवार वंदन…🙏🏼🙏🏼

     

          ©️ Shraddha Sudame 

             8830784103


Comments

  1. One more unknown character of महाभारत is being published by you.
    You are doing great research work.
    Hats off to you.
    Your hard work and dedication will definitely pay one day and shortly.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की