गोधडी
माहीत नाही हे सारं.. आजीकेव्हा करायची.. नातवांना आपल्या फुलासारखं जपायची.रोज रात्री मऊ पांघरूण हळूच घालायची.
आधीच बारीक डोळे ती अजून बारीक करायची.सुई दोरा घेऊन गोधडी शिवत बसायची.दुधावरच्या सायीसारखी..मऊ मऊ कापसासारखी..माईआजी आमची गोधडी करत बसायची.
सुखदुःखाची ठिगळं हसत हसत जोडायची..तिच्या नऊवारी लुगड्यांची घडीवर घडी घालायची…मायेच्या धाग्यांनी त्यांना टाके अलगद घालायची.आपल्या प्रेमळ हातांनी धावदोरा घालायची.माईआजीची गोधडी मग दिमाखात मिरवायची.
माईआजीची गोधडी आपल्या कुशीत घेवून निजवायची.बागुलबुवापासून… ती सार्या मुलांना लपवायची.लेकरं मग गोधडीत गुडूप होऊन जायची.थंडीला तर खूप लांब लांब पळवायची.
खरंतर माईआजी बाप्पाकडे गेली मागच्यावर्षी.हल्ली गोधडीपण हळवी होते जराशी.. आजीसारखीच सुरकुतलीय ती पण जराशी.जरा रंगही हल्ली फिका झालाय तिचा
तरी आजीच्या मायेचं अस्तर… पांघरते लेकरांना
©️®️Shraddha Sudame
Nagpur ( 8830784103)

Comments
Post a Comment