इतकंच 

पहाटेस अजून गारवा जाणवतो इतकंच

तुझी मिठी तेव्हा खूप आठवते इतकंच 


मोगरा पुन्हा बहरतोय सांगायचंय इतकंच 

पुन्हा तुझी आठवण येतेय इतकंच 


रेडिओवर हल्ली गाणं ऐकत नाही इतकंच 

तुझे सूर मैफीलीत ऐकू येतात फक्त इतकंच


तू कुठे दिसत नाही बस आता इतकंच

तुझे फोटो मनात साठलेत फक्त इतकंच


कधीकधी तुझा खूप राग येतो इतकंच

डोळ्यांत सारखं पाणी दाटतं फक्त इतकंच


तुझी सवय अजूनही जात नाही इतकंच 

दोन कप काॅफीचे रोज भरते इतकंच 


कट्टी तू घेतलीस..हे कसं इतकंच

मी का साॅरी म्हणू ..जा राहू दे इतकंच


      ©️®️ श्रध्दा सुदामे (अनामिका)











Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की