सरली जरी रात्र


 सरली जरी कधीची रात्र राजसा

उशीवरी माझ्या टिपूर चांदणे पडे


उजाडले आता खिडकीबाहेर सख्या

अंगणातही पडले प्राजक्त सडे


फिरूनी वेळ कितीदा विचारसी प्रिया

दाहीदिशास बघ फुटले तांबडे


विझले सांजदीप वृंदावनातील 

नहाली दवबिंदूत पहाट बागडे


रेंगाळते कुंतलात कुजबुज तुझी

पळाली आता न रात्र अशी सापडे


संपला मकरंद मधुर पाकळ्यांतील

तरी तहानले ओठ अजून का कोरडे


सोड हट्ट प्रियकरा भेट तू नव्याने

आतुर असेल पुन्हा मन माझे भाबडे

©️®️ अनामिका ( श्रध्दा सुदामे)




Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की