Comeback
रिक्षाऽऽऽ……लिंकींग रोडला चलणार का..
आज सकाळपासून दिवसभर
एकटीनेच ती फिरत होती.
गाॅगल, पर्स, आवडता परफ्युम…
मोकळेपणाचा आनंद
मनमुराद लुटत होती.
तिच्या इअरफोनवर आशा गात होती…कतरा कतरा मिलती है..कतरा कतरा जीने दो…जिंदगी है..जीने दो..
आज तिला कुणाचीच परवा नव्हती.
मनसोक्त विंडो शाॅपिंग, बार्गेनिंग बिनधास्त एन्जॉय करत होती.
हुश्श म्हणून ब्रेक घेत मँगोमस्तानीवर खुशाल chill करत होती.
आज ती बर्याच वर्षाने
स्वतःला भेटत होती.
मराठी नाटक,जुईचा गजरा ..
डेटवर ती एकटीच गेली होती.
पेंटींग्जच्या गॅलरीतून काही फोटोज कॅमेर्यात क्लिक करून घेत होती.
चक्क pout करून style मध्ये
selfie झकास काढत होती.
भारी feeling ती श्वासात भरून घेत होती.
कबुतरांचा थवा आकाशात उडाला..
ती पण उंच झोका घेत
संध्याकाळी चौपाटीवर
थोडा खट्टा थोडा मीठा म्हणत पाणीपुरीचं …
स्वर्ग सुख मनसोक्त अनुभवत होती.
रेतीतील लाटांत एकटीच भिजत होती.
बट सावरताना हाताने “ अनामिका” वाळूत हळूचकन गिरवत होती.
वाळूच्या कागदावर जणू
वारा झाला होता लेखणी
अन् उमटलेली चारोळी देखणी
मै मेरी फेवरेट हूं..
स्वतःला म्हणत होती.
सुंदर नजारा होता.. दूरवर एक नावाडी होडी वल्हवत होता. तिच्या इअरफोनवर गाणं ऐकू येत होतं…“वहा कौन है तेरा
मुसाफिर जायेगा कहा….”
समुद्रात Sunset होत होता …आणि तिचा स्वतःच्या आयुष्यात Comeback.
©️®️अनामिका(श्रध्दा सुदामे)

Comments
Post a Comment