कहा गये वो दिन

फर्ग्युसन रोजनिशी

भाग- 1

1)आपल्या सगळ्यांचाच काॅलेजचे दिवस हा सुंदर आठवणींचा असा ठेवा असतो ज्याचा सुगंध ठेवणीतील पैठणीसारखा असतो.

ते दिवस होते मी एम.एस्सी.करत होते.फर्ग्युसन काॅलेजला त्यावेळचे.

बहुतेकांचा हा गैरसमज असतो

मास्टर्स करणार्‍या मुली म्हणजे स्टुडियस, बुकवर्म अशी काही धारणा घेऊन येणारी 90% मुलं मुली असतात किंवा पी.जी.करणाऱ्या तेही फिजिक्समध्ये,पुणे युनिव्हर्सिटीतून 

म्हणजे हातावर मोजक्या लोकांच्यात  स्काॅलर स्टुडंट हा मान असे. याला अपवाद होतो मी आणि वर्षा.मी आणि माझी मैत्रिण नेहमी म्हणायचो सिनियर्स म्हणून काय सिरियस राहयचं का नेहमी? आम्ही डिस्टिंक्शन मिळवणाऱ्या गर्ल्स होस्टेलच्या अशा मुली ज्यांना खूप आवड होती कलेची, संगीताची, अभिनयाची.पण काय करणार आपली इमेज राखण्याकरता जुनियर्स् समोर खोटं बोलायला लागायचं.

म्हणजे उदाहरणार्थ बालगंधर्व ला नाटकाला निघालेलो असताना पुस्तकं पर्समध्ये कोंबून न्यायचो. “कुठे लायब्ररीत?”आम्ही येस वगैरे उत्तर देत पटकन निसटायचो.

ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीत जायचो आम्ही ,पण नेमकं जुनियर्स विचारायच्या त्यावेळी आम्ही सिनेमा,नाटक किंवा

बी.एम.सी.सी.रोडला कॅनव्हास पेंटिंगचा क्लास, गुडलक चौकात सुधीर फडकेंकडे सतारीचा क्लास असं निघालेलो असताना.

एकदा असंच सुमीत राघवनचं 

“रंग उमलत्या मनाचे” नाटक लागलं होतं आणि दुसर्‍याच दिवशी क्वांटम मॅकॅनिक्सचा पेपर होता आणि आम्ही चक्क बालगंधर्वला नाटकाला.जनाची नाही तर मनाची म्हणून माझी मैत्रीण मध्यांतरात पर्समधून नोट्स काढून वाचत होती.मला हसू येत होतं.शेवटी मी फक्त एक प्रश्न Schrodinger Equation 

तयार करून दुसर्‍या दिवशी पेपरला गेले.आणि चक्क पैकीच्या पैकी मार्क्स.ऐसा भी होता था…

2)काही जण  खरंच खूप वेडे असतात.त्यादिवशी रविवार होता म्हणून होस्टेलच्या मुली आरामात सकाळचे दहा वाजले तरी निद्रासुख अनुभवत होत्या आणि 

अचानक निळ्या डोळ्यांची, कुरळ्या केसांची प्रिया रानडे तारस्वरात गाणं गात entry घेत आली “ गोरी है कलायैया… तू ..ला दे मुझे हरी हरी चुडियां…अपना बना ले मुझे बालमा..” अमिताभ बच्चनचा नुकताच “ गंगा जमुना सरस्वती” रिलीज झाला होता आणि मीनाक्षी  शेषाद्री, जयाप्रदा यापैकी एकीच्या तोंडी हे गाणं होतं.प्रिया अकरावीत होती आणि जबरदस्त अमिताभची फॅन होती.तिचं आतापर्यंतचं अमिताभच्या पिक्चरचे फस्ट डे फस्ट शो चं रेकॉर्ड होतं आणि त्यादिवशी पण ती मुलींना विचारत होती “ अरे ओ जानेमन तू मूव्ही को चल आज संडे है ..” मी प्रियाला पाहून फारच इंप्रेस झाले होते.तू एकटीच जातेस का मूव्हीजला? मी प्रियाला विचारलं,  तिच्याकडे एक जास्तीचं तिकीट होतं त्यामुळे अर्थातच आम्ही तो सिनेमा पाहिला.आणि एवढंच नाही तर जेव्हा प्रियाला अमिताभची आठवण यायची ती अमिताभ बनायची आणि रेखा म्हणून वेगवेगळ्या मुली आळीपाळीने “ सुहाग”, मधील दांडिया ”मुकद्दर का सिकंदर” …डान्स नंबर करायच्या. 

३) उस्ताद अमजद अली खान पद्मविभूषण पुरस्कृत प्रसिद्ध सरोदवादक यांच्या बायकोची बहीण आमच्या होस्टेलवर रहायची.अतिशय अप्रतिम सुंदर होती ती आणि त्यांची बायको .त्यामुळे ते जेव्हाही तिला भेटायला यायचे काही मुली त्यांच्या बायकोला पहायला धावायच्या.आम्ही व्हिजिटर्स रूममध्ये मात्र अमजद अली खान यांना भेटून धन्य झालो होतो.

४) अजून एक आपल्याच धुंदीत जगणारं आमच्या होस्टेलचं पात्र होतं.ते म्हणजे जयश्री राऊत. पुणे युनिव्हर्सिटीला वुमन क्रिकेट संघाला represent करत होती जयू. बाॅय कट ,जीन्स टी शर्ट अशीच असायची.तिच्या वेळा अजब असत पहाटे चारला उठून मॅच किंवा प्रॅक्टीसला जाणे.सुट्टी असेल तर उशीरापर्यंत झोपणे.आणि सतत आपल्याजवळील काहीतरी सतत संपलेलं असणे.ती काही महिने माझी रूम पार्टनर असल्याने दूध, चहा, साखर अशा काही बिनधास्तपणे मागायची जसं मागच्या जन्मीचं माझं ऋण होतं बाकी.कधीकधी पैसे देखील.पण मला फार दया यायची तिची.स्वभावाने अतिशय गरीब होती.क्रिकेट खेळत असल्याने ती जेव्हा ते बॅट,ग्लोव्जवगैरे किट घेऊन मुलासारखं दाणदाण चालत निघे  तेव्हा तिचा एक दरारा

होता होस्टेलच्या मुलींना. एकदा घरी आली होती रहायला ती पण.

खाली फोटोत विविध वेशभूषेमध्ये  ...

तर असे काही आमच्या मैत्रीचे चित्र विचित्र नमुने..

घरापासून दूर राहून निखळ मैत्री कशी असते ती शिकावी ते हरहुन्नरी मैत्रिणींकडून.  

तुम्हाला काय वाटतं?

कहा गये वो दिन ..काश कोई जादू की छडी घुम जाय और पुराने दिन एक बार वापस आ जाय..


#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५ 


श्रध्दा सुदामे

नागपूर, गुरुवार, ५ जून २०२५

Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की