मेरे प्यार की धून

आज २१ जून “सुरपाखरू” गटात लेख लिहायला सुरुवात करायच्या आधी फेसबुकवर, इन्स्टाग्राम वर नेहमीची एक चक्कर मारली.तर लक्षात आलं आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.अनेक जणांचे योगासनं करतानाचे फोटोज, रील्स, ऑनलाइन योगा वर्ग सर्टिफिकेट्स झळकताहेत सकाळपासूनच.

मी म्हटलं आपण तर यातलं काहीच केलं नाही.नमनाला घडाभर पाणी म्हणून जरा हात हलवावे,व्यायाम करावा म्हटलं आणि थोडं अजून पेज स्क्रोल केलं तर “ ए भावसाहेब तू योगासन करते का योगासन. योगासन ने प्राणायाम! मी रोज एक घंटा योगासन करते योगासन!

आपल्याला कवा ताप नाय न् ब्लड प्रेशर नाय..सेव्हंटी एट पण माजे डोल्याला चष्मा नाय"हा पु .लं.च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तन काका मधील संवाद दिसला.एकदम फ्रेश मूड झाला.

पुढे जाऊन अमिताभ बच्चनच्या “कुली”सिनेमातील योगा करता करता “अब मुंह खोलीये और मिरची मुंह में डालिये” पासून रेडिओ ऐकून ऑम्लेट बनवणारा अमिताभचा व्हिडिओ पाहून हसून हसून फेस योगा झाला.म्हटलं चला आपलं आजच्या दिवशी कणभर का होईना पण योगात योगदान!

आता हे काय ..आज  संगीत दिवस पण आहे.

“पंछियों की चहचहाट है संगीत

सूखेपत्तों की सरसराहट है संगीत

फुलों की तबस्सूम है संगीत 

हर गीत में बसा तरन्नूम है संगीत”

या काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त मी लिहिलेल्या कवितेच्या ओळी दिसल्या.

संगीत, गाणं  नेहमीच आवडलंय मला.मागे इंडियन आयडल मध्ये एक स्पर्धक मुलगी होती तिला anxiety स्टेज फिअर होतं .ती गायची छान आणि perform करूनच तिने स्टेज फिअर घालवलं होतं. आमच्या घरी पण गाण्याच्या कार्यक्रमांच्या मैफीली असल्या की सराव असायचे.वादक, गायक सगळा ताफा.एका स्पर्धेत आम्ही गाण्याचा विडा उचलला. 

लहान मोठ्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत आम्ही “ गोरी गोरी पान दादा मला एक वहिनी आण” म्हणण्याची शपथ घेतली.शेवटी ती रात्र आली ..आमच्या नावाचा पुकारा झाला पण माझा स्टॅच्यू झाला होता.हातपाय गोठले होते आणि कुणीतरी मला विंगेतून स्टेजवर अक्षरशः ढकलले.मी तोल सांभाळत आले .समोर प्रचंड जनसमुदाय. तोंडाला कोरड पडली होती.दात वाजत होते.खाली बसलेले वादक घाबरून गेले होते.ही बया आता काय करेल म्हणून एकमेकाकडे सहेतुक बघत होते.

हार्मोनियमवाला मला गाण्याची scale विचारत होता पांढरी किती? माझ्यासमोर अंधारी आलेली असताना. अखेरीस परमेश्वराला माझी दया आली असावी आणि आमच्या मुखातून स्वर उमटले.स्पर्धेचा निकाल लागून चक्क तिसऱ्या क्रमांकावर झळकलो आम्ही.मग काय निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई , दिसते मजला सुखचित्र नवे अष्टविनायक मधील ते तेरे सूर और मेरे गीत पासून मेरे ढोलना सुन तक रोम रोम मे बसा है संगीत…


#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५


श्रध्दा सुदामे

नागपूर, शनिवार, २१ जून २०२५


Comments

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की