# कूल माॅम
नकळत आपल्या प्रत्येकाला एक टॅग लागलेला असतो.आणि तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आजूबाजूच्या व्यक्तींनी लावलेला असतो.जसं बोअरिंग पर्सन, डल, इंप्रेसिव लेडी,अरोगंट चाईल्ड.
तसाच हल्ली कूल माॅमचा टॅग असणं आवश्यक झालंय.सलमान खान जसा Being Human चा टीशर्ट घालून फिरतो तसा आईनेदेखील Cool Mom चा ॲपरन चढवला एकदा की सगळ्या गोष्टी सोप्या होतात.आपण एक पाऊल पुढे आलं तर मुलंही एक पाऊल मागे येतात आणि दोन जनरेशन मधील गॅप कमी होते.तर यासाठी जादुई छडी घुमाकर ,मुस्कराकर बच्चों को झप्पी देकर प्रत्येकीने हा कूल माॅमचा शिरपेच खोचावा आपल्या मुगूटात. आई ही आई असतेच पण मैत्रीचं नातं निर्माण करणं तितकंच गरजेचं झालंय हल्ली.पूर्वी मुलांना आई वडील आणि इतर वडीलधारी माणसांचा धाक असे .पण हल्ली equations चेंज झालीयेत. त्यामुळे गृहिणी असो किंवा वर्किंग आई .त्यासाठी तिने एक दीर्घ श्वास घ्यावा, डोक्यावर बर्फ ठेवावा आणि आपल्या मुलांसारखं त्यांच्याबरोबर चील करावं. कारण त्यांना आपण एखाद्या गोष्टीसाठी “नाही”म्हटलं तरी ते खोटं बोलून, लपवून फॅन्सी गोष्टी try करतात कारण आजूबाजूचं वातावरण , मित्र मैत्रीणी आणि सर्वात महत्वाचं त्यांचं “वय”. करून तर बघा हा बदल तुमच्यात.मग तुम्हाला ते आपली मैत्रीण मानू लागतात. हे सगळं आपोआप घडतं .मग ते आपल्या so called कूलमाॅमबरोबर मूव्हीज, वेबसिरीज बघतात.सगळे सिक्रेट्स शेअर करतात.आपलं ओपिनियन घेतात.चक्क आईचं ऐकतात. आणि मराठी सिनेमाला, नाटकाला आईबरोबर येतात.अगदी शाॅपिंग मध्ये कूल माॅमला बरोबर नेतात. आपण पिझ्झा खाल्ला तर भाजीपोळी पण आवडीने खातात.सणावाराला रूढी परंपरा जपतात. फरक एवढाच आहे ते एकसिव्या शतकात तर आपण जन्मलो ते विसावं शतक होतं.ह्या नात्यात आईशी तिची तरूण मुलं खोटं बोलत नाहीत .लपवालपवी नसते.आणि मुख्य म्हणजे दोघांमध्ये खूप संवाद होतो.जो हल्ली मोठा प्राॅब्लेम झालाय अनेक कुटूंबात. पालकांचा कूल नेचर किंवा फ्रेंडली अप्रोच हा नेहमीच मुलं व पालक यात पारदर्शक नात्याचा बाॅन्ड निर्माण करतो.कूल माॅम कधीच आपल्या जनरेशन Z च्या आपल्या मुलांचे मोबाईल चेक करणे , स्पाय करणे असल्या गोष्टी करत नाहीत. उलट त्यामुळे फॅमिलीत तणाव राहतच नाही. पण विश्वास राहतो. किशोर वयातील या मुलांना आईने प्रेझेंट फॅशन्स कॅरी कराव्यात असंच वाटत असतं. अर्थात एकमेकांना स्पेस देणे व त्याचा आदर करणे हे महत्वाचं असतं. सतत चिडचिड करणारी, रागवणारी लोकं आपल्याला तरी आवडतील का ?
काहीजण कूल याचा अर्थ केअरलेस किंवा लिबरल असा अर्थ घेतात.त्यामुळे इक्वेशन्स बिघडतात.काहींना बॅलन्स ठेवणं अवघड जातं पण मुलांची स्तुती करणं, त्यांना शाबासकी देणं अगदी छोट्या कारणासाठी कूल माॅम सहजपणे करते. समुपदेशनासाठी येणाऱ्या पालक, मुलं यांचे अनुभव आणि समस्या ह्याच असतात अनेकदा.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जून२०२५
श्रध्दा सुदामे
नागपूर, रविवार, ८ जून २०२५
Comments
Post a Comment