वृषाली
काय ओळख सांगू वृषालीची?
सूर्यपुत्र महारथी कर्णाची प्रथम पत्नी?
एक सूतकन्या वृषाली?
कर्णाची बालमैत्रीण वृषाली?
चार पुत्रांची माता वृषाली?
काही ओळख घेतली तरी सौम्य, हसतमुख ,शांतपणे परिस्थितीशी जुळवून घेणारी ,आलेल्या आव्हानांना निश्चयाने सामोरी जाणारी कोमल रुपातील दुर्गा मला नेहमीच वृषाली दिसते.
प्रेमाची व्याख्या-
वृषालीसाठी कर्णावरचं प्रेम म्हणजे अर्पणभाव, क्षमाशीलता असं होतं.कर्णाला तिने नेहमीच दोषांसकट स्वीकारलं .
विवाह एक कर्तव्य -
कर्णाने मात्र वृषालीशी कर्तव्य म्हणून प्रेम केले.अथांग आणि प्रशांत महासागरासारखे. कदाचित संपूर्ण कुटूंबाला तिने बांधून ठेवलंय ह्याची त्याला कल्पना होती.कर्णाचे आईवडील
अधिरथ व राधाई ह्यांनी कर्णाचा सांभाळ केला असला तरी कर्ण सूतपुत्र नाही हे माहीत असून वृषालीने आपल्या या सासू सासऱ्यांना प्रेमाने, सन्मानाने
जपले.
कर्णाच्या द्वितीय पत्नीचा स्वीकार-
वृषालीने काळजावर दगड ठेवून उरूवीचा कर्णाच्या दुसर्या पत्नीचा आदराने स्वीकार केला.
आपल्या यातना हसतमुखाने पचवणारी ही सौम्य दुर्गा.मृदुभाषा हे तिचं शस्त्र.
पुत्रांचे युध्दात अर्पण-
दुर्योधनाची संगत आणि कर्णाची अधोगती याने वृषालीचा मृदू स्वर कडवट होत असे.आपले पुत्र वृषाली, शत्रुघ्न, द्विपाद आणि सुशेषण कौरव पांडव युध्दात विनाकारण ओढले जातायेत हे ती बघत असे.
जीवापाड प्रेम करून वाढवलेले आपले पुत्रांचे एकामागोमाग मृत्यू सहन करून उभी असलेली वृषाली.आधी सुदामन हा पुत्र द्रौपदी स्वयंवरात झालेल्या दुर्घटनेत बळी जातो आणि उरलेले पुत्र कुरुक्षेत्रात वीरगतीस प्राप्त झाले.
कर्ण त्याची ओळख व सामर्थ्य सिध्द करण्यास काय करतोय .योग्य अयोग्य यातील भेद विसरून दुर्योधनाच्या मैत्रीच्या आड आपलं कुटूंब युध्दात विनाकारण समर्पित करतोय. हे ती फक्त बघत होते कारण कर्णाने दुसर्या विवाहानंतर वृषालीच्या कक्षात येणंही बंद करून टाकलं होतं.तरी अपार प्रेम करत राहिली ती कर्णावर.बालमैत्रीण वृषाली ते पत्नी हा प्रवास करताना कर्णात होत गेलेले बदलाची ती साक्षीदार होती.चंपानगरीत भेटलेला सखा सारथी अधिरथपुत्र कर्ण ते अंगदेश नरेश कर्ण .वृषालीला कर्णावर होत गेलेला हा विषारी बदल जाणवत गेला.
गमावलेल्या पतीवरील निस्सीम प्रेम -
उरूवी, दुर्योधन यामुळे कर्ण वृषालीपासून एकाच महालात असून इतका दूर गेला की कुरुक्षेत्रात सहज समर्पित झाला.
आणि खचलेल्या वृषालीने देखील प्राण सोडले.
अशा या पतिव्रता दुर्गेला … कर्णपत्नी वृषालीला त्रिवार वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼
©️Shraddha Sudame
8830784103

आज एक अजून अनामिक पण महत्वाच्या पात्राची ओळख करून दिल्याबद्दल आभार मानावे तितके कमीच.
ReplyDeleteअत्यंत साध्या सरळ सुलभ भाषेत संपूर्ण पत्र
उलगडून दाखवले .काय अन् किती कौशल्य.
Hats off to you श्रध्दा.
Keep it up.
Best of luck.