Posts

Comeback

Image
 Comeback रिक्षाऽऽऽ……लिंकींग रोडला चलणार का.. आज सकाळपासून दिवसभर  एकटीनेच ती फिरत होती. गाॅगल, पर्स, आवडता परफ्युम… मोकळेपणाचा आनंद मनमुराद लुटत होती. तिच्या इअरफोनवर आशा गात होती…कतरा कतरा मिलती है..कतरा कतरा जीने दो…जिंदगी है..जीने दो.. आज तिला कुणाचीच परवा नव्हती. मनसोक्त विंडो शाॅपिंग, बार्गेनिंग बिनधास्त एन्जॉय करत होती. हुश्श म्हणून ब्रेक घेत मँगोमस्तानीवर खुशाल chill करत होती. आज ती बर्‍याच वर्षाने  स्वतःला भेटत होती. मराठी नाटक,जुईचा गजरा .. डेटवर ती एकटीच गेली होती. पेंटींग्जच्या गॅलरीतून काही फोटोज कॅमेर्‍यात क्लिक करून घेत होती. चक्क pout करून style मध्ये selfie झकास काढत होती. भारी feeling ती श्वासात भरून घेत होती. कबुतरांचा थवा आकाशात उडाला.. ती पण उंच झोका घेत  संध्याकाळी चौपाटीवर  थोडा खट्टा थोडा मीठा म्हणत पाणीपुरीचं … स्वर्ग सुख मनसोक्त अनुभवत होती. रेतीतील लाटांत एकटीच भिजत होती. बट सावरताना हाताने “ अनामिका” वाळूत हळूचकन गिरवत होती. वाळूच्या कागदावर जणू वारा झाला होता लेखणी अन् उमटलेली चारोळी देखणी  मै मेरी फेवरेट हूं.. स्वतःला म्हणत ...

सरली जरी रात्र

Image
 सरली जरी कधीची रात्र राजसा उशीवरी माझ्या टिपूर चांदणे पडे उजाडले आता खिडकीबाहेर सख्या अंगणातही पडले प्राजक्त सडे फिरूनी वेळ कितीदा विचारसी प्रिया दाहीदिशास बघ फुटले तांबडे विझले सांजदीप वृंदावनातील  नहाली दवबिंदूत पहाट बागडे रेंगाळते कुंतलात कुजबुज तुझी पळाली आता न रात्र अशी सापडे संपला मकरंद मधुर पाकळ्यांतील तरी तहानले ओठ अजून का कोरडे सोड हट्ट प्रियकरा भेट तू नव्याने आतुर असेल पुन्हा मन माझे भाबडे ©️®️ अनामिका ( श्रध्दा सुदामे)

मुझे सिर्फ तुम्हे देखना है

Image
  मुझे सिर्फ तुम्हे देखना है मुझे नही देखने तुम्हारे लेदर  शूज .रे बॅन की गाॅगल  नही देखनी तुम्हारी ब्रॅन्डेड वाॅच.. तुम जैसे भी हो..  तुम आना सिंपल लिबाज में तुम्हारे महंगे कपडे… तुम्हे  कम किमती बना देते है… तुम आना पुरानी शर्ट में मुझे तुम्हारी तय्यारी नही सिर्फ तुम्हे देखना है… तुम आना घर के छत पे या किसी ढाबे पे ..तुम मिलना किसी गली के.. चाय की टपरी पे… मुझे नही देखनी तुम्हारी तन्ख्वाह  नही देखने तुम्हारे पासपोर्ट्स, व्हिसाज  मुझे नही चमकना तुम्हारे साथ मुझे सिर्फ देना है तुम्हारा साथ मुझे देखना है तुम्हारा आत्मविश्वास मुझे सिर्फ तुम्हे मेहनत करते देखना है कद में तुम क्यूना छः फिटसे भी कम हो पर मुझे तुम्हे देखना है  आसमान को छूते हुए…उडान भरते हुए मुझे तुम्हे देखना है खुद से लढते हुए आखिर में… मतलब मुझे … मुझे तुम्हे देखना है खुश रहते हुए मुझे तुम्हे देखना है स्त्री को सम्मान देते हुए ©️®️ अनामिका (श्रध्दा सुदामे)            20/5/25

अस्तित्व

Image
                  1)कविता -  सुवासिनी तिच्याशिवाय नुसतंच असतं घर दगड मातीचं… नुसत्याच दारं खिडक्या बाकी रितेपण...  खरंतर काटकसरीच्या काड्यांनी विणत असते घरटं ही सुगरण… म्हणूनच तिच्यामुळे येत असतं घराला घरपण… तिच्याशिवाय असतं सुनं सुनं अंगण ती म्हणजे अंगणावरील शेणाचं सारवण पोपडे उडालेल्याभिंतीवर प्रेमाचं लिंपण ती जळत असते चुलीजवळ… जसं निखार्यातील सरपण जीव ओतून, चटके सोसून करत असते सगळ्यांसाठी भाजी भाकरी कालवण  आपल्या माणसांचं सुख हीच तिची साठवण..  तिच्यामुळेच असतं सासुरवाशीणचं माहेरपण  तिच्यावीण सुनं बाळाचं बालपण आजी, आई, आत्या, सासू, मामी, मावशी, मुलगी असेल ती कुणीही तिच्यामुळेच तर येतं देव्हार्यालाही देवपण.. ती म्हणजे तुळशीसमोरील सडा संमार्जन सदैव ज्योत बनून जळत राहते ही “सुवासिनी”  जसं अखंड निरांजन                   ©️®️श्रध्दा सुदामे                  2) कविता -  अस्तित्व  असतो तोच एक क्षण फसवा फक्त सुव...

इतकंच

Image
                      इतकंच  पहाटेस अजून गारवा जाणवतो इतकंच तुझी मिठी तेव्हा खूप आठवते इतकंच  मोगरा पुन्हा बहरतोय सांगायचंय इतकंच  पुन्हा तुझी आठवण येतेय इतकंच  रेडिओवर हल्ली गाणं ऐकत नाही इतकंच  तुझे सूर मैफीलीत ऐकू येतात फक्त इतकंच तू कुठे दिसत नाही बस आता इतकंच तुझे फोटो मनात साठलेत फक्त इतकंच कधीकधी तुझा खूप राग येतो इतकंच डोळ्यांत सारखं पाणी दाटतं फक्त इतकंच तुझी सवय अजूनही जात नाही इतकंच  दोन कप काॅफीचे रोज भरते इतकंच  कट्टी तू घेतलीस..हे कसं इतकंच मी का साॅरी म्हणू ..जा राहू दे इतकंच       ©️®️ श्रध्दा सुदामे (अनामिका)
Image
 लिमलेटची गोळी     हॅपी चाॅकलेट डे कुसूम! इश्श,तुमचं आपलं काहीतरीच हं…हे काय वय आहे का आपलं? पोरं,सुनबाई ,नातवंडं  काय म्हणतील पाहिलं तर…हसतील सारे..म्हणतील आजी आजोबा वेडे झालेत. म्हणू दे म्हटलं तर… आपण नाही का रोज नातवांना समोरच्या वाण्याकडून कॅडबरी चाॅकलेट आणत देवळातून येताना! आज मला तुला द्यायचंय, माझ्या बायकोला.इश्श!  एवढी काय लाजतेस? शाळेत तर मुद्दामून उशीरा यायचीस . मागे बसायला जागा मिळावी म्हणून. माझ्या शेजारीच. चितळे मास्तर भिंगाच्या चष्म्यातून पाहत मिश्किल हसायचे. ते सोडून घरच्यांना अजूनही वाटतंय की आपलं अरेंज मॅरेज आहे म्हणून.  हो कशी विसरेन मी.न चुकता तुम्ही दोन गोष्टी आणायचात माझ्याकरता. बकुळीचा गजरा आणि लिमलेटच्या गोळ्या.अजूनही त्या फुलांचा दरवळ आहे आजूबाजूला. कसे भुर्रकन उडून गेले ना ते तरूणीईतील दिवस! कोण म्हणतं तू म्हातारी आजीबाई आहेस.. ओ मेरी जोहराजबी… तू अभीतक हसीन और मैं जवाब…तुझपे कुरबान मेरी जान मेरी जान…. अहो बलराज सहानी,तुम्हाला पण हॅपी चाॅकलेट डे! ©️®️ श्रध्दा सुदामे

बाबा

Image
                                                  बाबा  दगडाच्या पाटीवर अ आ ई गिरवताना, पाढे, उजळणी पासून.. अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासून हात धरून वळण  लावणारा बाबा…  गणवेषखरेदीपासून नवीन पुस्तकांच्या खाकी कव्हर पर्यंत बरोबर असणारा बाबा. आपल्या बालपणी सोसलेले चटके आपल्या लेकरांना बसू न देणारा, "कुणी घर देेता का घर "म्हणत आपल्या बालपणी अनाथालयात राहिलेला बाबा पोटच्या पोरांना मात्र सदैव तळहाताच्या फोडासारखा जपत आला.काय सांगू बाबा तुमचं बालपण तुमच्याकडून ऐकलं की अजूनही डोळे डबडबतात या लेकीचे ...   कसं लिहू या चार ओळींत , डायरीतील एका पानावर जन्मापासून सारं काही जे एका बाबानं लेकरांसाठी केलं…  शाळा ते काॅलेजपर्यंत हा वटवृक्ष सावलीसारखा असायचा सतत लेकीबरोबर असणारा बाबा… बघता बघता  दिवसामागून  दिवस , महिने , वर्ष भुर्रकन उडाली. आणि एक दिवस परकर पोलक्यातली ही लेकही माहेरच्या घरट्यातून उडाली. कळलंच नाही कधी प्रगतिपुस्तकावर सही कर...