मेरे प्यार की धून
मेरे प्यार की धून आज २१ जून “सुरपाखरू” गटात लेख लिहायला सुरुवात करायच्या आधी फेसबुकवर, इन्स्टाग्राम वर नेहमीची एक चक्कर मारली.तर लक्षात आलं आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.अनेक जणांचे योगासनं करतानाचे फोटोज, रील्स, ऑनलाइन योगा वर्ग सर्टिफिकेट्स झळकताहेत सकाळपासूनच. मी म्हटलं आपण तर यातलं काहीच केलं नाही.नमनाला घडाभर पाणी म्हणून जरा हात हलवावे,व्यायाम करावा म्हटलं आणि थोडं अजून पेज स्क्रोल केलं तर “ ए भावसाहेब तू योगासन करते का योगासन. योगासन ने प्राणायाम! मी रोज एक घंटा योगासन करते योगासन! आपल्याला कवा ताप नाय न् ब्लड प्रेशर नाय..सेव्हंटी एट पण माजे डोल्याला चष्मा नाय"हा पु .लं.च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तन काका मधील संवाद दिसला.एकदम फ्रेश मूड झाला. पुढे जाऊन अमिताभ बच्चनच्या “कुली”सिनेमातील योगा करता करता “अब मुंह खोलीये और मिरची मुंह में डालिये” पासून रेडिओ ऐकून ऑम्लेट बनवणारा अमिताभचा व्हिडिओ पाहून हसून हसून फेस योगा झाला.म्हटलं चला आपलं आजच्या दिवशी कणभर का होईना पण योगात योगदान! आता हे काय ..आज संगीत दिवस पण आहे. “पंछियों की चहचहाट है संगीत सूखेपत्तों की सरसराहट है संगीत फुलों क...