Posts

चंद्रभागेच्या तीरी

Image
    पुराणांपासून बघितलं तर स्त्री रूपवान असेल, समाजातील खालच्या स्तरातील असेल तर तिच्याविषयी उलटसुलट चर्चांना नेहमीच उधाण येते.हे अगदी १५व्या शतकापासून ते आजतागायत चालत आलंय.कधी भवतालची परिस्थिती,कधी कौटुंबिक परिस्थिती तर कधी तिचे निर्णय या चर्चांना कारणीभूत ठरतात. आज आषाढीनिमित्त अशाच एका साध्वी स्त्रीचं स्मरण करूया. तिला खरं तर अख्खा महाराष्ट्र ओळखतो.आपल्या भक्तीरूपी शक्तीने आपल्यावरील संकट तिने कसे थोपवले?कोण आहे ती देवत्वास पोहोचलेली स्त्री? आषाढीएकादशीनिमित्त वारकरी संप्रदाय पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर ,भक्तीरसात मग्न होऊन दाखल झालाय. अभंग, भजनं यांचा पाऊस पडतोय. या अभंगांची रचयती दिव्य, तेजःपुंज स्त्री ..जिचं नाव आहे कान्होपात्रा ..हो तिच वर उल्लेखलेली संत कान्होपात्रा. तिचं स्मरण तर करायलाच हवं ना!कान्होपात्राचा जन्म पंढरपुरातील सोलापूर जिल्ह्य़ातील मंगळवेढा इथे शामा नावाच्या गणिकेच्या पोटी झाला.जसजशी कान्होपात्रा लहानाची मोठी होऊ लागली तिचं रूप हा चर्चेचा विषय होऊ लागला.ऐषोआरामी आणि सुखोपभोगी वातावरणात कान्होपात्रा वाढत होती. तिच्या महालात सेवेस दासी होत्या.ल...

मेरे प्यार की धून

Image
मेरे प्यार की धून आज २१ जून “सुरपाखरू” गटात लेख लिहायला सुरुवात करायच्या आधी फेसबुकवर, इन्स्टाग्राम वर नेहमीची एक चक्कर मारली.तर लक्षात आलं आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.अनेक जणांचे योगासनं करतानाचे फोटोज, रील्स, ऑनलाइन योगा वर्ग सर्टिफिकेट्स झळकताहेत सकाळपासूनच. मी म्हटलं आपण तर यातलं काहीच केलं नाही.नमनाला घडाभर पाणी म्हणून जरा हात हलवावे,व्यायाम करावा म्हटलं आणि थोडं अजून पेज स्क्रोल केलं तर “ ए भावसाहेब तू योगासन करते का योगासन. योगासन ने प्राणायाम! मी रोज एक घंटा योगासन करते योगासन! आपल्याला कवा ताप नाय न् ब्लड प्रेशर नाय..सेव्हंटी एट पण माजे डोल्याला चष्मा नाय"हा पु .लं.च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तन काका मधील संवाद दिसला.एकदम फ्रेश मूड झाला. पुढे जाऊन अमिताभ बच्चनच्या “कुली”सिनेमातील योगा करता करता “अब मुंह खोलीये और मिरची मुंह में डालिये” पासून रेडिओ ऐकून ऑम्लेट बनवणारा अमिताभचा व्हिडिओ पाहून हसून हसून फेस योगा झाला.म्हटलं चला आपलं आजच्या दिवशी कणभर का होईना पण योगात योगदान! आता हे काय ..आज  संगीत दिवस पण आहे. “पंछियों की चहचहाट है संगीत सूखेपत्तों की सरसराहट है संगीत फुलों क...

डिमेन्शिया- हरवलेली माणसं

Image
   शेजारच्या बंगल्यात ती दोघंच रहात.मुलं परदेशी स्थायिक झाली होती.आमचा छान घरोबा होता.लहानपणी आम्हां मुलांना अंगाखांद्यावर खेळवलं होतं दोघांनी.नातवंडं, पोरं, सुना परदेशात असल्याने नेमकं आता उतारवयात दोघंच उरली होती एकमेकांसाठी.आईची,आमची एकतरी दिवसातून त्यांच्याकडे फेरी असायचीच.शांताआजी आणि आजोबा रोज दुपारी कलत्या ऊन्हाची झालर अंगावर घ्यायचे.जणू काही किरणांची दुलई पांघरायचे.खिडकीतून छान कोवळं ऊन आत यायचं.थंडीत पारा खाली गेला की दुपारचं ऊनही कोवळं वाटायचं. आजी फणीने केस विंचरत ,मग छानसा अंबाडा घालत ऊन्हात बसायच्या. त्यांचे निळसर झालेले डोळे ऊन्हात प्रिझमसारखे चमकायचे. निळ्या लोलकांतून सूर्यकिरणं परावर्तित  होऊन निरागस हास्य आजींच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर दिसायचं.मी गोडाचा शिरा आईने केलेला आजी आजोबांकडे घेऊन फाटकाच्या आत शिरतच होते आणि “आजही काय तेजःपुंज दिसतेय स्वीटहार्ट”असं आजोबा आजीला थट्टेने म्हणाले.तुमचं आपलं काहीतरीच म्हणत आजी पण लाजली.जणू हे नार्मल होतं दोघांसाठी. आजोबादेखील समोरच्या अंगणात आरामखुर्चीत रेलून ऊन अंगावर घेत वर्तमानपत्र वाचत बसले.पेपर वाचताना अर्धा तास...

बालिका वधू

   टेलिव्हिजनच्या कलर्स वाहिनीवर यायची ती मालिका समजला असाल तर नाही. ही नायिका मालिके मधील अजिबात नाही.. तर ही आहे खरी तुमच्या माझ्यासारखीच पण बालपण हरवलेली मला भेटलेली बालिकावधू. साधारण इयत्ता पाचवीत वगैरे मी असेन. दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होत्या शाळेला. साखरकारखान्यात नवीन गळीतहंगाम सुरु झाला होता. रोजच्या चार चार शिफ्ट असत कामगारांना. पहाटे ४ ते दुपार १२,१२ते ८, ८ ते ४ आणि जनरल शिफ्ट ७•३० ते ५•३०. प्रत्येक शिफ्ट बदलताना तीन भोंगे होत. सुट्टया असल्यामुळेच की काय त्यादिवशी पहाटेच्या पहिल्या भोंग्याला नेमकी जाग आली. बंगल्याच्या मागच्या व्हरांड्यात फेऱ्या मारणं सुरू होतं माझं आणि कारखान्याच्या बाजूने धूर येताना मला दिसला. सुरुवातीला वाटलं चिमणीचा धूर असेल. पण लक्षात आलं धूर वाढत चालला आहे. तेवढ्यात बाबांना जनरल ऑफीसमधून फोन आला होता कारखान्यात मोठी आग लागली होती आणि आजूबाजूलाच वसाहतीतील घरापर्यंत ती आग झपाट्याने पोहचत होती. बाबा वेगाने साखरकारखान्यात गेले. आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो. आमच्या साठी नव्हे पण ज्यांची घरे पाचटांपासून बनलेल्या चाळीत होती त्यांच्यासाठी. थोड्यावेळात क...

दरवळ

Image
“गुड्डी” मधील जया भादुरीची आठवण यावी असं अनेक वेळा माझ्या बाबतीत योगायोगाने घडलं बालपणी. सिनेमा सुरू होण्यापूर्वी थिएटर मध्ये ज्या इंडियन न्यूज , जाहिराती दाखवत त्याचं चित्रीकरण कारखान्याच्या परिसरात व्हायचं म्हणजे अपघात कसे टाळायचे किंवा आरोग्याची काळजीविषयक न्यूजवगैरे.तर एक शूटिंग मला आठवतं आमच्या घरीच त्या जाहिरातीतील युनिटमधील बायकामाणसं नऊवार लुगडी, शेतमजूर असं तयारी करून गावातून कारखान्यात शूटिंगसाठी रवाना करण्यात आल्या होत्या आणि मागोमाग आम्ही बच्चे कंपनी पण .मजा यायची त्यात भाग घेताना. तसंच आमच्या इथे साखरकारखान्यात गणेशोत्सव म्हणजे एकापेक्षा एक दर्जेदार मराठी नाटकांची पंधरा दिवस लूट असे.याचं आता महत्त्व कळतंय मोठेपणी पण लहान असताना कोण हे कलाकार , किती मोठी माणसं काही जाणीव नव्हती. एक गमतीदार अनुभव सांगते.गणेशोत्सवातील त्यादिवशी पण रोजप्रमाणे नाटक होते. आम्ही जेवण करून छान गजरा वगैरे असं तयार होऊन जाऊन बसलो.मी नऊदहा वर्षांची असेन, थोड्यावेळात नाटक बघता बघता झोपून गेले.जाग आली तेव्हा मला आईबाबा उठवत होते.पटकन चल म्हणत रंगभूमीच्या मागे नेत म्हणाले अर्धा तासाचा छोटासा रोल आहे तुल...

लोणच्याची बरणी

  केशवसुतांनी म्हटलंय “ खादाड असे माझी भूक .चतकोराने न मला सुख.मनास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे.” मंडळी ऋतूंप्रमाणे निसर्ग रंग बदलतो, बहरतो.निसर्गच काय आपलं स्वयंपाकघर देखील रंगीबेरंगी फळभाज्यांनी बहरत असतं.हिवाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतू अतिशय आवडीचे आहेत माझे. का माहितेय? तुमचे देखील असणारच. बरोबर ओळखलंत कारण या दिवसांत खाद्यपदार्थांची रेलचेल असते म्हणून आणि त्यात खास मनसोक्त लोणची आणि पापड करता येतात म्हणून .आणि जेव्हा मी केलेल्या लोणच्याला दाद मिळते तेव्हा तर खूप भारी वाटतं.मूठभर मांस चढतं अंगावर.  उन्हाळा म्हणजे कैरीचं लोणचं….मुरांबा, साखरांबा,पन्हं आणि हो कैरीची डाळ कशी विसरून चालेल! आंब्याच्या झाडाला मोहोर यायला लागला की लगेच लोणच्याच्या बरण्या खरेदी करणं अशी तयारी दरवर्षीच… ताज्या लाल मिरच्या बाजारातून आणायच्या, ऊन दाखवायचं , बाईकडून देठं खुडायची आणि लालचुटुक तिखट दळून आणायचं.केवढं हे बाळंतपण. हल्लीच्या मुलींना नाही कळायचं .हळकुंड दळणे.. हळदीचा तो सुवास..मी जात्यावर दळताना पाहिलंय आजीला आणि दळताना सुंदर ओव्या गाताना देखील. आमच्या बालपणी परीक्षेचा सिझन आणि आईने वा...

सवाई गंधर्व - एक आठवण

Image
   फर्ग्युसनलाच असताना केलेल्या अनेक दिव्य साहसांपैकी हे एक. दरवर्षीच डिसेंबर जानेवारीच्या थंडीचा कहर असताना सवाई गंधर्व महोत्सव ही दहा दिवसांची पुणेकरांसाठी संगीतमय मेजवानीच असते.त्यामुळे आम्ही त्या मौसमात न्हाऊन घ्यायचो. रोज रात्री आठ ते पहाटे सहा वाजेपर्यंत दिग्गज घराण्यातील शास्त्रीय गायक वेगवेगळे राग तल्लीन होऊन गात.अहाहा काय समा चढायचा. आम्ही शिकत असल्याने घरून जे काही आम्हाला मर्यादित पैसे मिळत त्यात आम्ही खर्च adjust करत असू.त्यामुळे सवाई गंधर्वची महागडी तिकीटे आणि पासेस आमच्या बसकी बात नही थी… लेकीन फेस्टिवल तो देखनाही था.. अब क्या करे असं आम्ही विचारात असताना एक खुशखबर कानावर उडत उडत आली.ती अशी की बहुतेक अरसिक लोकं भल्यापहाटे दोन वाजताच अर्ध्या कार्यक्रमातून निघून जातात त्यामुळे बसायला अगदी समोरची बैठक सहज मिळते.आम्ही लगेच रोज पहाटेचं आमचं ध्येय साध्य करण्याची योजना आखली.आमच्याकडे वाहनं नव्हती.त्यामुळे आम्ही rent ने सायकली करायच्या.साधारण पाच सहा किलोमीटर अंतर कापायचे म्हणजे साडेतीन वाजताच होस्टेलवरून निघावे लागणार होते. कारण त्या आधी लवकर शक्य नव्हते.तसं आम्ही दर रव...